रोटरी स्कूलच्या भावेश गिरासेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड* दोडाईचा मुस्तफा शाह

 


*रोटरी स्कूलच्या भावेश गिरासेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड*

दोडाईचा मुस्तफा शाह 

 महाराष्ट्र राज्य पुणे युवक क्रीडा संचलनालय आणि धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व शिरपूर तालुका शासकीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथे संपन्न झालेल्या धुळे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या भावेश गिरासे याने 14 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय  कॅरम स्पर्धेत खेळातील कौशल्यांचे उत्तम प्रदर्शन करीत आपल्या फेरीतील सलग चार सामने जिंकत यश संपादन केले असून त्याची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूला क्रीडाशिक्षक श्री अजय हजारे, श्री जितेंद्र भदाणे, सौ. राजश्री भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

    विजयी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, समन्वयक श्री प्रशांत जाधव यांनी अभिनंदन  करून विभागीय कॅरम स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने