डी. राजा यांची पुन्हा महासचिवपदी निवड – महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना राष्ट्रीय कौन्सिलवर मानाचा बहुमान

 


डी. राजा यांची पुन्हा महासचिवपदी निवड – महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना राष्ट्रीय कौन्सिलवर मानाचा बहुमान


नवी दिल्ली (प्रतिनिधी):

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिनांक २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान महत्वाचे राजकीय आणि संघटनात्मक ठराव मांडण्यात आले. महासचिव डी. राजा यांनी मांडलेल्या या ठरावांवर देशभरातील विविध राज्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. महाराष्ट्रातून एड. कॉम्रेड सुभाष जी लांडे आणि तल्ला शेख यांनी ठाम भूमिका सादर केली.


या अधिवेशनात तीन वर्षांसाठी महासचिवपदी डी. राजा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव मंडळात महाराष्ट्रातील डॉ. भालचंद्र कांगो यांची निवड झाली.


राष्ट्रीय कौन्सिलवर महाराष्ट्रातून एड. कॉम्रेड सुभाष जी लांडे, कॉ. राजू देसले, कॉ. शाम काळे, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. राम बाहेती, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. विराज देवांग, कॉ. बबली रावत या प्रतिनिधींची निवड झाली.


अधिवेशन काळात २२, २३ व २४ सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब पक्षाने सर्व प्रतिनिधींसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन करून अधिवेशन यशस्वी केले.


या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अँड. हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा कम्युनिस्ट पक्षाचे सचिव वसंत पाटील, धुळे शहर सचिव पोपटराव चौधरी, अँड. संतोष पाटील (शिरपूर तालुका सचिव), साहेबराव पाटील, अर्जुन कोळी, तुळशीराम कौतिक, जितेंद्र देवरे, भरत सोनार यांसह धुळे जिल्ह्यातील सर्व कौन्सिल सदस्यांनी निवड झालेल्या प्रतिनिधींना हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने