वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प अहवाल लेखन कार्यशाळा



 वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प अहवाल लेखन कार्यशाळा


शिरपूर, येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये वाणिज्य शाखेतील एम.कॉम. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प अहवाल लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. दिनेश भक्कड यांनी मार्गदर्शन व उद्बोधन केले. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवाल लेखन प्रक्रियेची सखोल माहिती देणे आणि त्यांना संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी सक्षम करणे हा होता.


कार्यशाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधन प्रकल्प तयार करण्याची, प्रस्ताव सादर करण्याची व पुढील सेमिस्टरमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची कार्यपद्धती सविस्तर समजावण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी विषय निवडणे, माहिती संकलन करणे, विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे आणि अहवालाची रचना याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. उपप्राचार्य डॉ. दिनेश भक्कड यांनी सांगितले की, प्रकल्प अहवाल लेखन हा केवळ अभ्यासक्रमाची गरज नाही, तर विद्यार्थ्यांच्या संशोधन कौशल्यांचा विकास आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढविण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध संशोधन पद्धती, डेटा संकलनाचे तंत्र, अहवालातील सुसंगतता आणि संदर्भ वापरण्याचे महत्त्व समजावले.


महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी उत्सुकता, व्यावसायिक दृष्टिकोन आणि प्रकल्प पूर्ण करण्याची आत्मविश्वासपूर्ण वृत्ती वाढली. या एक दिवशीय कार्यशाळेच्या  यशस्वी आयोजनाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, विश्वस्त रोहितभाऊ रंधे, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ एस. एन. पटेल, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, उपप्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. दिनेश भक्कड यांनी मार्गदर्शन व नियोजन केले तर संगणक विभागप्रमुख प्रा. संदीप सोलंकी, आयक्युएसी समन्वयक डॉ.संदीप चौधरी, प्रा. किशोर राजपूत, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. संतोष रत्नपारखे, प्रा. राजेश पावरा, प्रा. रीना जाधव, प्रा. यु.जी पाटील, प्रा. किरण सोनार, प्रा. भूपेंद्र मोरे यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने