*दोडाईचा येथे मुस्लिम समाजा कडून*" *"अप्पर तहसीलदार यांना निवेदन.** दोडाईचा दि 26\9\25 मुस्तफा शाह

 


**दोडाईचा येथे मुस्लिम समाजा कडून*"

 *"अप्पर तहसीलदार यांना निवेदन.**


दोडाईचा दि 26\9\25

मुस्तफा  शाह 

निवेदन देणार खालील सही करणार समस्त मुस्लीम समाज, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे विषय- । Love Muhammad लिहिल्‌यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेणेबाबत.

१) वरील विषयास अनुसरून निवेदन सादर करतो की, नुकत्याच उत्तर प्रदेश मधील कानपूर येथे फक्त । Love Muhammad लिहिल्यावर २५ मुस्लीम तरुणांवर बेकायदेशीर पद्धतीने FIR दाखल करण्यात आलेली आहे. सदरची कार्यवाही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे तसेच भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे.

२) संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचे स्वतंत्र दिलेले आहे. तसेच अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला जीवित आणि व्यक्तिगत स्वतंत्रतेचा अधिकार प्रदान करतो

३) तसेच । Love Muhammad लिहिणे कोणत्याही धर्माचा अपमान नाही याउलट हे तर एक सकारात्मक, प्रेम आणि श्रद्धेचे प्रतिक आहे. हे लिहिण्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाही आणि संविधानावर आघात आहे.

 माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये हे स्पष्ट केलेले आहे की अभिव्यक्ती स्वतंत्रता हि लोकशाहीची आत्मा आहे आणि याला दाबणे हे असंवैधानिक आहे. तरी देखील अश्या प्रकारे आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणांवर याप्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समह निवेदन सादर केले

आमच्या मागण्या खालीलप्रमाणे

१ निर्दोष तरुणांवर दाखल केलेले सर्व गुन्हे परत घेण्यात यावेत भविष्यात कोणत्याही समाजाची धार्मिक श्रद्धा आणि भावनात्मक अभिव्यक्तीवर या प्रकारची असंवैधानिक कार्यवाही केली जाऊ नये

प्रत

मा. जिल्हाधिकारी सो धुले

मा. गृहमंत्री सो महाराष्ट्र राज्य

मा. राष्ट्रपती सो, भारत सरकार दिल्ली

.:- मोईनुद्दीन (मोना) मंसुरी. इरफान खाटीक, मदनी रजा,इरफान बागवान, शाकीर लोहार,जुबेर शेख, हाजी अय्युब  मुनीर, मोहसीन (बबलू) मंसूरी, रईस शेख  जुबेर बागवान, हाजी इद्रिस, शोएब अली, आसिफ रजा,शोहेब ईद्रीस .

आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने