आनंद खेडा येथे ज्येष्ठ नागरिकांची काळजी व संरक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला

 


📰 आनंद खेडा येथे ज्येष्ठ नागरिकांची काळजी व संरक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला


आनंद खेडा, ता. धुळे (दि. १८ सप्टेंबर २०२५) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे व लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद खेडा येथे "ज्येष्ठ नागरिकांची काळजी व संरक्षण" हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ. फरीदा खान यांनी केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मान्यवर मान्यवरांनी लावली —


मा. मनिषा अनंत ठाकूर (विस्तार अधिकारी शिक्षण, जि.प. धुळे)


मा. निशा जाधव (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पावस्व  जि.प. धुळे)


मा. मनिषा अहिरे (सरपंच, आनंद खेडा)



तसेच क्षेत्रकार्य समन्वयक प्रा. डॉ. फरीदा खान व प्रा. डॉ. दिलीप घोंगडे तसेच बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू चे क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सूत्रसंचालन संजना पवार यांनी केले.


सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना मा. मनिषा ठाकूर यांनी सादर केली. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क, समस्या आणि त्यांचे महत्व अधोरेखित केले. तसेच पालक व ज्येष्ठ नागरिक पालनपोषण व कल्याण कायदा २००७ विषयी माहिती दिली.


कार्यक्रमात पथनाट्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षण कायद्याची जनजागृती करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ व उपस्थितांना ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांविषयी जागरूकता मिळाली. कार्यक्रमात २०-२५ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.


आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी अनिल पाटील, उज्वला बहिरम, देवेंद्र पिवाल,  संजना पवार, सचिन हालोरे व वसंती वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने