रोटरी स्कूलच्या नऊ खेळाडूंची विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड* दोडाईचा अख्तर शाह

 


*रोटरी स्कूलच्या नऊ खेळाडूंची विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड*


दोडाईचा अख्तर शाह 

 महाराष्ट्र राज्य पुणे युवक व क्रीडा संचलनालय आणि धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत  दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या 9 खेळाडूंनी जुडोचे विविध डावपेच वापरून जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले असून या सर्व खेळाडूंची नाशिक  विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धेत मुलांच्या 14 वर्षाआतील 40 किलो वजनगटात गौरव मगरे, 45 किलो वजनगटात हिमांशु म्हसदे, मुलींच्या 14  वर्षाआतील 27 किलो वजनगटात संस्कृती ठाकूर, 32 किलो वजनगटात नेहा महाजन, 36 किलो वजनगटात युक्ता बागुल, 40 किलो वजनगटात सिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या 17 वर्षाआतील  40 किलो वजनगटात दुर्गेश धनगर, मुलींच्या 36 किलो वजनगटात यशिका महाजन, तर 63 किलो वजनगटात धनश्री तेली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली  आहे. या स्पर्धेत पिंपळनेर, धुळे,  धुळे ग्रामीण, दोंडाईचा या शाळेतील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेला निर्णय अधिकारी म्हणून श्री दिनेश बागुल व प्रशांत वाणी लाभले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक जितेंद्र भदाणे, अजय हजारे, राजश्री भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकार, संचालक मंडळ, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, समन्वयक  श्री प्रशांत जाधव यांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने