एस आर बी इंटरनॅशनल स्कूलला 'माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेत तालुकास्तरीय तृतीय बक्षीस*
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित 'माझी शाळा, सुंदर शाळा' या राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
*मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार* धुळे येथे आयोजित या शानदार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित धुळ्याचे खासदार डॉ.शोभा बच्छाव धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे सोनी कदम योजना शिक्षणाधिकारी पुष्पलता पाटील या मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले यांना एस आर बी इंटरनॅशनल स्कूलसाठी तालुकास्तरीय तृतीय पारितोषिक देण्यात आले.यावेळी मान्यवरांनी एक लाख रुपयांचे बक्षीसासह स्मृती चिन्ह प्रमाणपत्र शाळेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या अद्वितीय कामगिरीसाठी दिले.
*शाळेने राबविले अनेक उपक्रम* याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अध्ययन अध्यापनसाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञान सोयी सुविधांसह डिजीटल बोर्डांचे क्लासरुम दर्जेदार शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.यासह शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळण्यासाठी आणि परिसरात हिरवीगार जागा तयार करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले यासाठी अथक परिश्रम घेतले.या शाळेला मिळालेल्या बक्षिसाने शाळेने शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचे महत्त्वही जपले आहे. शाळेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले आहे. यानंतर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत यशस्वी अनुष्का पावरा या नववीच्या विद्यार्थीनीस आणि शाळेचा कबड्डी खोखो संघांना जिल्हा स्तरावर मिळालेल्या यशासाठी पारितोषिक वितरण करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सरांनी सर्व विद्यार्थी शिक्षक पालकांचे अभिनंदन केले आहे.शाळेने पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन उत्कृष्ट कामगिरी केली.