न्या.प्रीती श्रीराम यांना पीएच.डी.प्रदान

 


फोटो कॅप्शन ः पीएच.डी.प्रमाणपत्र स्वीकारतांना न्या.प्रीती श्रीराम. सोबत संजय खरात

न्या.प्रीती श्रीराम यांना पीएच.डी.प्रदान




शिरपूर/प्रतिनिधी

शिरपूर येथील रहिवासी व नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयाच्या न्या.प्रीती श्रीराम यांना जळगाव येथील कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, न्या.प्रीती श्रीराम यांनी सायबर लॉज विथ रेफरन्स टू एडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक  एविडेंस इन इंडिया ः सोशिओ लीगल स्टडी या विषयात संशोधन केले.  नुकतीच त्यांना विद्यापीठातर्फे पीएच.डी.प्रदान करण्यात आली. 

न्या.श्रीराम यांना जळगाव येथील एस.एस.मणियार विधी महाविद्या लयाच्या सहयोगी प्रा.डॉ.रेखा पहुजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे येथील ॲड.गणेश शिरसाट, दीनानाथ हाके, आर्किटेक्ट संजय खरात, सौ.नीलिमा हाके, श्रीमती स्वराली श्रीराम, सौ.कल्याणी श्रीराम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

न्या.प्रीती श्रीराम ह्या दै.आपला खान्देशचे संपादक अशोक श्रीराम व माजी नगरसेविका सौ.निर्मला श्रीराम यांच्या कन्या आहेत. 

न्या.प्रीती श्रीराम यांच्या यशाबद्दल नवी मुंबई येथील सर्व न्यायिक अधिकारी, आ.अमरीशभाई पटेल, आ.काशीराम पावरा, धुळे जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.तुषारभाऊ रंधे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,  शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सुप्रसिध्द व्यापारी डिगंबरशेठ माळी, राधेश्याम पंडित, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागूल, मोतीलाल माळी, ॲड.पी.पी.अेंडाइत, ॲड.शांताराम महाजन, निवृत्त पोस्ट मास्तर जानकीराम बडगुजर, निवृत्त मुख्याध्यापक एम.सी.पाटील, सुप्रसिध्द व्यापारी राधेश्याम शर्मा, माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत, राजेंद्र भंडारी, रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी चतुर देवरे, माजी मुख्याध्यापक उत्तमराव माळी, गव्ह.कॉन्ट्रॅक्टर कैलास गिरासे, विठ्ठल लॉन्सचे संचालक भिका माळी, निवृत्त पोलीस निरीक्षक धनराज कोळी, माजी नगरसेवक सोनुशेठ सोनार, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी, माजी नायब तहसीलदार लक्ष्मणराव सूर्यवंशी, नथ्थूभाऊ पतपेढीचे संचालक परेश दोरीक, करवंदचे माजी उपसरपंच अशोक गोरख पाटील, साप्ता.पुण्य खान्देशचे संपादक के.बी.लोहार, ॲड.निखिल सोनवणे, ॲड.निलेश एस. पाटील, ॲड.अमित जैन, ॲड. गोपालसिंग राजपूत, ॲड.शालीनी सोनवणे, तालुक्यातील पत्रकार बांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. 



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने