एच.पी. टी. आर्ट्स व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयात रा.से. योजनेचा सृजनरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न* नाशिक प्रतिनिधी युवराज सिंह राजपूत



*एच.पी. टी. आर्ट्स व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयात रा.से. योजनेचा सृजनरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न* 

नाशिक प्रतिनिधी युवराज सिंह राजपूत


सृजनरंग स्पर्धेतून व्यक्तिमत्त्व विकास, समाजभान आणि संस्कारांचा संदेश दिला जातोय असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री सागर वैद्य यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी. आर्ट्स अँड आर.वाय.के. सायन्स कॉलेज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृजनरंग’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धांचे एच.पी.टी.- आर. वाय. के. महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री वैद्य बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करून कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक विभागीय सचिव, डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सदानंद भोसले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजयप्रसाद अवस्थी यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित करत “राष्ट्रीय सेवा योजना आई हे, नई रोशनी लायी है असं म्हणत स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.”



श्री. सागर वैद्य यांनी एन.एस.एस. स्वयंसेवक निष्ठेने आणि श्रद्धेने समाजासाठी काम करतात. आज आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचे स्वरूप बदलायला हवे, सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी युवा पिढीकडून दाखवल्या गेल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.

प्रा. डॉ. सदानंद भोसले उपस्तीथ यावेळी ते बोलताना म्हणाले की 'मी नव्हे, आपण' या तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी काम  करतात. एच.पी.टी.-आर.वाय.के महाविद्यालयाचे नाव आज विद्यापीठाच्या स्तरावर आहे, तसेच विद्यापीठांमध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी विशेष अशा कार्यशाळा आयोजित केला जाणार असल्याचं आश्वासन दिलं.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही.एन सूर्यवंशी यांनी, 

विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवा म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर शांततेसाठी प्रयत्न करावेत. प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणं हीच खरी देशसेवा आहे असे म्हणत या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी उत्तम असं काम करतात असं म्हणत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत देशपांडे यांनी, चुका आणि शिका या तत्त्वावर या स्पर्धेत सहभागी व्हा निकालाचा विचार करू नका असं म्हणत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे संयोजकांचे आणि स्पर्धा परीक्षकांचे आभार मानले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्य अश्विनी घनबहादूर उपस्थित होते. स्पर्धा आयोजनासाठी प्रा. सागर वराडे, आणि डॉ. भारती कोल्हे यांनी विशेष  परिश्रम घेतले. वक्तृत्व ,निबंध, काव्यवाचन, पथनाट्य, भित्तीचित्र, पोवाडा गायन अशा विविध स्पर्धांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. 

तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तन्मय जोशी व प्रा. सोनाली म्हरसाळे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने