शिरपूरला रब्बी हंगाम पूर्व कृषी विक्रेत्यांचे प्रशिक्षण संपन्न

 


शिरपूरला रब्बी हंगाम पूर्व कृषी विक्रेत्यांचे प्रशिक्षण संपन्न

थाळनेर (प्रतिनिधी) 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद धुळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूरला तालुकास्तरीय रब्बी हंगाम पूर्व कृषी विक्रेत्यांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी सिताराम चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकारी भास्कर जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय पवार,शिरपूर पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी राजेश चौधरी, तालुका गुणनियंत्रण अधिकारी विशाल  मोटे, महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक सूर्यवंशी,शिरपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन.टी.सोनवणे,पेंढारकर आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाने बियाणांच्या उत्पादनापासून विक्री पर्यंत सनियंत्रणासाठी 

 *साथी पोर्टल* विकसित केले आहे. साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज १ व फेज २ अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे.साथी पोर्टलचा उद्देश शेतकऱ्यांसाठी सुलभता,गुणवत्ता नियंत्रण,परराज्यातील बियाण्यावर नियंत्रण, शोधण्यायोग्यता,वितरण नियंत्रण व पारदर्शकता यासाठी आहे. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सूर्यवंशी व धुळे जिल्हा मोहीम अधिकारी भास्कर जाधव यांनी कृषी विक्रेत्यांना पीपीटी द्वारे प्रात्यक्षिक दाखवून सखोल मार्गदर्शन केले.तसेच MFMS प्रणाली व इ पॉश मशीन बाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विक्रेत्यांनी विचारलेल्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले.

    या प्रशिक्षण शिबिरास तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी,उपाध्यक्ष गौरव अग्रवाल,सचिव भूपेश अग्रवाल,खजिनदार निलेश अग्रवाल,संघटनेचे राजेश पगारे,नामदेव धनगर,गोपाल जाधव,जगदीश पाटील, ललित जाधव,लक्ष्मण पाटील,संजय अग्रवाल, विवेक पाटील,भरत पाटील,जितेंद्र संचेती, शिरीष महाले, प्रकाश वाणी,शिवाजी गोपाल व बहुसंख्य कृषी विक्रेते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने