तलाठ्याची २५ हजारांची लाचखोरी! धुळे लाचलुचपत विभागाची चाळीसगावमध्ये कारवाई – तलाठी मोमीन अडचणीत

  






तलाठ्याची २५ हजारांची लाचखोरी!  लाचलुचपत विभागाची चाळीसगावमध्ये कारवाई – तलाठी मोमीन अडचणीत



धुळे  प्रतिनिधी- 


चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका शेतजमिनीवरील जुनी हक्कातील नोंद कमी करण्यासाठी तलाठ्यांनी २५,००० रुपयांची लाच मागितल्याचा ठपका असून, सदर रक्कम तलाठ्यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत लोंजेचे रोजगार सेवक वाडीलाल पवार यांनी स्वीकारल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीवरील जुनी नजर व गहाण घेणाऱ्याचे नाव वगळण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. २ जुलै २०२५ रोजी तलाठी मोमीन यांना कार्यालयात भेट देण्यात आली असता त्यांनी “तुमचे काम मोठं आहे, वाडीलाल पवार यांच्याशी बोला” असे सुचवले.

त्यानंतर तलाठी, रोजगार सेवक आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या चर्चेत तलाठ्यांनी कामासाठी पैसे देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. १४ व १७ जुलै रोजी झालेल्या भेटींमध्ये तलाठ्यांनी पुन्हा “वाडीलालला भेटा” असे सांगितले. अखेर २५,००० रुपयांची रक्कम देण्याची मागणी झाली.

३० जुलै २०२५ रोजी सापळा कारवाई करताना वाडीलाल पवार यांनी ही रक्कम चाळीसगाव येथील तलाठी कार्यालयाबाहेर स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. सदर रक्कम तलाठी मोमीन यांना द्यायची होती, परंतु त्या आधीच अटक करण्यात आली.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या टीमने केली. तपासात पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल यांचा समावेश होता.

या प्रकरणात खाजगी व्यक्ती दादा बाबू जाधव यांनी लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रेरित केल्याचा आरोप असून, त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

हा प्रकार उघड झाल्यामुळे महसूल खात्याची विश्वासार्हता पुन्हा प्रश्नचिन्हात आली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने