🌿 शिरपूरच्या सुधीर अशोक पाटील सरांना 'महाराष्ट्र पुरस्कार' जाहीर! राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत मानाचा सन्मान

 




🌿 शिरपूरच्या सुधीर अशोक पाटील सरांना 'महाराष्ट्र पुरस्कार' जाहीर! राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत मानाचा सन्मान


शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावाचे सुपुत्र व पर्यावरण कार्यासाठी झटणारे सुधीर अशोक पाटील सर यांना ‘महाराष्ट्र पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांचा राज्यस्तरीय सन्मान नुकताच २६ जुलै २०२५ रोजी पुण्यात करण्यात आला.


या पुरस्काराचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती आणि हस्ती बँक, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. पुणे येथील यश रेजन्सी, शिवाजीनगर येथे भरलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत सुधीर पाटील सर यांना गौरवण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन राजेंद्र सनेर (महाव्यवस्थापक, महा मेट्रो पुणे) होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी संचालक कैलास मोती, उपसचिव हंसध्वज सोनवणे (नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई), आयुक्त महेश पाटील (टीआरटीआय, पुणे आयएएस), मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लटकत, परिषद संयोजक आबासो आर. डी. पाटील, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, हस्ती बँकेचे चेअरमन कैलासभाऊ जैन, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब दीपक पाटील आणि धुळे जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. बी. पाटील (धुळे जिल्हाध्यक्ष) यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी संतोषराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विश्वास पगार सर (जिल्हा सचिव) यांनी केले.


सुधीर पाटील सर यांचा हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण शिरपूर तालुक्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक जनजागृती यामध्ये त्यांच्या योगदानाचे राज्यस्तरीय स्तरावर कौतुक करण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने