*ललित राजपूत यांना एमबीबीएस पदवी - राजपूत कुटुंबाचा गौरव*
वणी मळाणे (ता. जि. धुळे) – सध्या वास्तव्य नवी मुंबई (वास्तु आंगण, कळंबोली सेक्टर ४) येथील रहिवासी अरुण वनेसिंग राजपूत व सौ. संगीता अरुण राजपूत यांचे सुपुत्र ललित अरुण राजपूत यांनी फिलिपिन्स देशातील गुल्लास कॉलेज ऑफ मेडिसिन येथून यशस्वीरीत्या एमबीबीएस पदवी संपादन केली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राजपूत व मित्र परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. ललित यांच्या या यशामागे केवळ पालकांचेच नव्हे, तर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणाऱ्या आत्मीय एज्युकेशनचे डॉ. चिराग वाघेला यांचेही मोलाचे योगदान आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीपासून त्यांनी वेळोवेळी दिलेले योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्यामुळेच हा प्रवास अधिक सुलभ झाला. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल राजपूत परिवाराने त्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.