*दोंडाईचात प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्काजाम आंदोलन
दोंडाईचा,अख्तर शाह
दोंडाईचा येथे नंदुरबार चौफुलीवर प्रहारचे जनशक्ती पक्षाचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष पंकजसिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग, विधवा, शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ मच्छीमार व कामगार आणि आरोग्य आणि शिक्षण आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या या विषयावर नंदुरबार चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यांत आले. शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झालाच पाहिजे, दिव्यांगांना 6 हजार मानधन मिळालेच पाहिजे, बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, प्रहार जनशक्ती पक्षाच्या विजय असो. अशा घोषणा देत,चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी साहेब व टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया यांनी अप्पर तहसीलदार मा. संभाजी पाटील यांना निवेदन दिले.यावेळी प्रहारचे गजानन पाटील,विखरणचे गुरव नाना, सीमाताई बागले महिला शहराध्यक्ष, कैलास तिरमले, आनंद मोरे, देवेंद्र ठाकूर, पावभा गिरासे, वंदना गिरासे, दिपक पाटील, चुनिलाल धनगर, प्रकाश बेडसे,रिनाताई भोई,शिवाजी कोळी आदी प्रहार सैनिक उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई गिरासे, रिपब्लिकन पार्टीचे रामभाऊ माणिक, कैलास आखाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे, उबाठा शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, शैलेश सोनार ,कॉग्रेसचे राहूल माणिक, गिरीश पाटील,माजी नगरसेवक रवी जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते निंबा दाजी पाटील,पिंटू महाजन हे आंदोलन स्थळी उपस्थित होते.