*दोडाईचा प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी**
दोडाईचा मुस्तफा शाह
या कार्यक्रमाला *प्रमुख पाहुणे* म्हणून संग्रामसिंग गिरासे, रणजीत गिरासे, प्रमोदभाऊ गिरासे व राजेंद्र बागल सर तसेच *प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय दोंडाईचा* येथील *ब्रह्मकुमारी* माधुरी दीदी रीना दीदी उपस्थित होते. *ब्रह्मकुमारी* माधुरी दीदी यांनी विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शन करून संबोधित केले. *संस्थेच्या चेअरमन* सौ चंद्रकला सिसोदिया चंद्रशेखर सिसोदिया *शाळेचे प्राचार्य* ललित कुवर सर व *अॅडमिनिस्ट्रेशन* अमोल बागल सर यांच्या हस्ते *प्रमुख पाहुण्यांचा* सत्कार करण्यात आला. या प्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टीरूपात सांगितले. तसेच *शाळेत सुंदर असे फलक लेखन* लक्ष्मण गवळे सर व *कार्यक्रमाचे चित्रीकरण फोटो* जितेंद्र निकम सर व भटेश्वरी गिरासे मॅम यांनी केले. *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन* विनोद गीते सर व शितल जगताप मॅडम यांनी केले. अमोल बागल सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. *कार्यक्रमाचे नियोजन* शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.