शिरपूर पोलीसांची वेगवान कारवाई – दुकानफोडीनंतर २४ तासांत २६ हजारांची रोकड हस्तगत, आरोपी जेरबंद!

 



शिरपूर पोलीसांची वेगवान कारवाई – दुकानफोडीनंतर २४ तासांत २६ हजारांची रोकड हस्तगत, आरोपी जेरबंद!

शिरपूर / प्रतिनिधी –

शिरपूर शहरात झालेल्या दुकानफोडीच्या प्रकरणात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत अचूक आणि वेगवान कारवाई करत २६,००० रुपयांची रोकड हस्तगत केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

फिर्यादी मयूर दत्तू सोनार (रा. करवंद, ता. शिरपूर) यांनी तक्रार दिली होती की, ८ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता ते ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कृण्णामाई अमृततुल्य चहा आणि जनरल स्टोअर या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने २६,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली होती.

या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४६/२०२५ भादंवि कलम ३३१(४), ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक परदेशी यांनी डी.बी. पथकाला तत्काळ तपासासाठी आदेश दिले.

तपासादरम्यान पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे यांना गुप्त माहिती मिळाली की करवंद गावातील तवरेज शेख नाजीम शेख (वय २४) हा व्यक्ती दुकानफोडी प्रकरणात संशयित आहे. पोलिसांनी कळमसरे गावाजवळील अरुणावती नदी पुलाजवळ संशयित व्यक्तीस पायी जात असताना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस पंचनामा करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून खालील प्रमाणे रोकड हस्तगत करण्यात आली ₹24,500, 500 रुपयांच्या 49 नोटा₹1,500/-100 रुपयांच्या 15 नोटा असे एकूण 26,000/- रोख रक्कम हस्तगत केली.

ही कारवाई २४ तासांच्या आत करून पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून पुढील तपास पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, तसेच डी.बी. पथकातील पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भुटू साळुंके, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार आणि होमगार्ड मिथुन पवार यांनी केली.


शिरपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि दक्षता कौतुकास्पद असून नागरिकांत पुन्हा एकदा सुरक्षा आणि विश्वास निर्माण झाला आहे.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने