“MPSC-UPSC मार्गदर्शनासाठी सुवर्णसंधी; राजपूत समाज संस्थेचं विशेष आयोजन!”
शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील युवा पिढीला स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी करण्याच्या हेतूने महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था, शिरपूर यांच्या वतीने एक विशेष मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आयोजित केले गेले आहे.या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत – श्री. अभिनवसिंह राजपूत (संस्थापक, सिल्हिल IAS, दिल्ली) व श्री. किरणसिंह सिसोदिया (अहमदाबाद,
सुराय ,दोंडाईचा). हे दोघंही राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शिबिराचे सहप्रायोजक उद्योजक - श्री. धनराज राजपूत (थाळनेरकर) – बालाजी सेफ्टी प्रॉडक्ट्स, मुंबई आहेत.
कार्यक्रमाचे नांवनोंदणी संपर्क -
श्री. मुर्गेश भगवानसिंग राजपूत,
मो.९४०४९७३२७६ (संजिवनी कॉम्मुटर, इंदिरा हॉस्पीटल शॉपिंग,शिरपूर)
श्री.शैलेंद्रसिंग अंबरसिंग गिरासे,
मो.९४२१४५९०२७ (ओमकार मेडिकल, राज पॅलेस,करवंद नाका,शिरपूर)
श्री.प्रविणसिंग चंद्रसिंग गिरासे,
मो.९८६०२८०५१३ (आई पेडकाई झेरॉक्स,करखंद नाका,करवंद रोड,शिरपूर)
श्री.सुरेशसिंग बाबुरावसिंग गिरासे
मो.७९७२१६९१८८ (साई संस्कृती,पार्संल हॉऊस, निमझरी शहादा रोड,शिरपूर)
श्री. महेंद्रसिंह गुलझारसिंग राजपूत मो.९९२१९८११४५ (साई मोबाईल गुजराथी कॉम्प्लेक्स समोर,शिरपूर)
कार्यक्रमाचे आयोजन – महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था, शिरपूर.या संस्थेचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह सरदारसिंह राजपूत ,मो.7498981950), उपाध्यक्ष श्री. योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया (मो. 9850279222), व व्यवस्थापक श्री. प्रवीण बाबूसिंह राजपूत (मो. 8007950695) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचा दिनांक व वेळ:
शनिवार, दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता.
कार्यक्रमाचे ठिकाण:
स्व. इंद्रसिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल (राजपूत भवन), वस्हाटी रोड, दादूसिंह कॉलनी, शिरपूर, जिल्हा धुळे.
शिरपूर व परिसरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींसाठी ही एक अत्यंत मौल्यवान संधी असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.