भाजपा नंदूरबार जिल्हा अध्यक्ष पदी निलेश माळी यांची फेरनिवड निवड

 



(बामखेडा प्रतिनिधी} - भाजपा नंदूरबार जिल्हा अध्यक्ष पदी निलेश माळी यांची फेरनिवड निवड झाल्या बद्दल, माळी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

  भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नंदूरबार जिल्हा अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निलेश श्रीराम माळी यांची जिल्हा अध्यक्षपदी वर्णी लागल्याने शहादा तालुका माळी समाजाच्या वतीने अनरद (ता. शहादा) येथे निलेश माळी यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.श्री माळी  यांना दुसऱ्यांदा पक्षाने जिल्ह्याची  जबाबदारी दिल्याने, व निवडीबद्दल  माळी समाजाने आनंदउत्सव साजरा केला. पक्ष संघटन, पक्ष बांधनी,पक्ष वाढीसाठी मेहनत तसेच गोरगरिबांसाठी नेहमी तत्पर या  जोरावर पक्षाने माळी  यांना पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या  निवडीबद्दल सर्वत्र  अभिनंदन होत आहे.यावेळी समता परिषद नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, सावता फाउंडेशन चे संस्थापक राजेंद्र  माळी, समता परिषद शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, भाजपा कर्मचारी आघाड़ी जिल्हा उपाध्यक्ष मनोज गायकवाड़, महेन्द्र पाटिल,वकील महेश माळी, राजेंद्र माळी,सावता फाउंडेशन जिल्हा सचिव यादवराव माळी,अनरदचे माजी सरपंच वासुदेव माळी, डी के वाघ , हीरालाल वाघ, आबा माळी,नवल वाघ , माळी समाज अध्यक्ष सुरेश वाघ, पूनम माळी,  प्रताप माळी, गंगाधर माळी ,चेतन माळी, मनोज वाघ, देविदास माळी, हिम्मत माळी, छोटू महाजन, योगेश वाघ, सदानंद वाघ, योगेश माळी, गोपाल माळी, दिनेश माळी, विनोद वाघ ,सागर माळी, लोटन वाघ व समाज बांधव  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने