दोंडाईचा बस स्थानकात एस टी चा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला* दोडाईचा( अख्तर शाह)

 


*दोंडाईचा बस स्थानकात एस टी चा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला*

दोडाईचा( अख्तर शाह)

आज दिनांक १ जून रोजी दोंडाईचा बस स्थानकात एस टी चा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हितेंद्र महाले साहेब महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हाध्यक्ष तसेच श्री जितेंद्र गिरासे सर माजी नगरसेवक श्री राजन मोरे पत्रकार श्री समाधान ठाकरे पत्रकार श्री रंनजीत गिरासे

पत्रकार अख्तर शाह ,पत्रकार श्री मनोज पारख प्रवाशी संघटना उपाध्यक्ष हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री नरेंद्र भाबड यांनी प्रास्ताविक करून एसटीच्या महतीविषयी व आगाराच्या कामकाज संबंधी विश्लेषण केले संपूर्ण 2024व25 आर्थिक वर्षात दोंडाईचा आगार 1 कोटी 67 लाखाने नफ्यात असून नाही एप्रिल 2025 मध्ये 46 लाख रुपये फायद्यात आहेत.त्यानंतर श्री हितेंद्र महाले सो यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर राजन मोरे,श्री टाटीया सर,समाधान भाऊ ठाकरे पत्रकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सर्व प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले,संपूर्ण बस स्थानक सुशोभित करून बस स्थानकावर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती यावेळी स्थानक प्रमुख निखिल पाटील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रंजीत बागुल ,श्री नरेंद्र गिरासे ,देविदास रोकडे श्री तानाजी सोनटक्के, गोपाल सामोले,प्रवीण उमप ,वाहतूक  नियंत्रक आडगाले ,वाहतूक नियंत्रण अनिल गिरासे हे उपस्थित होते मान्यवरांचे आभार श्री नरेंद्र भाबड यांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने