लेख :- १५ जून - रुग्णदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस* *रुग्णसेवा हेच जीवन ध्येय-मंगेश चिवटे*




 *लेख :- १५ जून - रुग्णदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस*

*रुग्णसेवा हेच जीवन ध्येय-मंगेश चिवटे*

 लेखक - रणवीर राजपूत,निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क,मंत्रालय*

मित्रहो,समाजातील गोरगरीब निराधार,निर्धन अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना *आरोग्य* हा मूलभूत प्रश्न सोडविणे अतिशय अवघड जाते.परिणामस्वरूप अनेकांना आपले जीव नाहक गमवावे लागतात,ही वस्तुस्थिती आहे.यावर ठोस तोडगा काढून निर्धन लोकांचे जीव वाचविण्यासाठी ना.एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती झाली.त्यावर अनुभवी,कर्तव्यदक्ष व प्रामाणिक व आज्ञाधारक असलेले आपले विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांची प्रमुख पदी नियुक्ती केली.


शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून चिवटेसरांनी सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी सदर कक्षासाठी आपल्या पसंतीची एक सक्षम टीम उभी केली.अन् त्यातूनच मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवेची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ झाली. *रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा* हे ब्रीद उराशी बाळगून ना.एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार तर,कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा अश्वमेघ मंगेश चिवटे यांनी २०१७ साली हाती घेतला.त्याची परिणिती म्हणजे आज राज्यातील हजारों गोरगरीब लोकांना विविध वैद्यकीय कारणांसाठी अर्थसहाय्य मिळत आहे. 


वास्तवात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मुळ संकल्पना मंगेश चिवटे यांचीच आहे.माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्यात युती सरकार स्थापन झाले.रुग्णसेवेची आवड असलेले पूर्वाश्रमीचे पत्रकार मंगेश चिवटे यांनी मा. फडणवीससाहेबांकडे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष* ची संकल्पना मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.चिवटेसरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अल्पावधीतच यश येऊन १७ मार्च २०१५ पासून या योजनेतून पात्र व गरजू रुग्णांना निधी देण्यास प्रारंभ होऊन गोरगरिबांना जणू 

नवजीवनाची संजीवनीच मिळाला आहे,हे निष्पन्न होते.


उल्लेखनीय बाब म्हणजे  एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सुमारे ६०,००० हून अधिक निराधार रुग्णांवर राज्यातील नामवंत रुग्णालयांत मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत अन् ते आनंदाने निरोगी जीवन जगताहेत. 


उल्लेखनीय बाब म्हणजे आत्तापर्यंत राज्यातील गोरगरीब लोकांच्या सुमारे ६००० बालकांच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याच्या नामवंत अशा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन होऊन...ती मुलं आज आनंदी व सुदृढ जीवनाचा दीर्घश्वास घेताहेत.या सर्व 

शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सुमारे ४२५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले.महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री  वैद्यकीय सहाय्यता कक्ष निष्क्रिय झाला होता.त्याला ऊर्जितावस्थेत ना.एकनाथजी शिंदे यांनी आणले.विशेष म्हणजे सध्या उपमुख्यमंत्री असूनही ना. एकनाथजी शिंदे यांच्या हातून तितक्याच वेगाने रुग्णसेवा होताहे.त्यात काही अंतर पडले नाही.


चिवटेसरांचा त्यांच्या वाढदिवशी अल्प परिचय करून देणं क्रमप्राप्तच ठरते.मंगेश चिवटे यांचा जन्म १५ जून १९८८ रोजी स्वातंत्र्य सेनानी साथी मनोहरपंत चिवटे(आजोबा) यांच्या देशप्रेमी घराण्यात झाला.ज्यांची करमाळ्याचे(जि.सोलापूर) पहिले नगराध्यक्ष म्हणून जनमानसात ओळख आहे.चिवटे यांच्या पिताश्रींचे नाव नरसिंह मनोहरपंत चिवटे तर,मातोश्रींचे सौ.मंदाकिनी नरसिंह चिवटे.तर पत्नीचे नाव सौ.शिल्पा मंगेश चिवटे.त्यांना ज्ञानेश्वर व मुक्ताई हे द्वय अपत्य.मंगेश हे शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले.त्यांचे शालेय शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात,तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी.कॉलेज मध्ये झाले.त्यांनी मराठी या विषयात एम.ए.करून त्यानंतर बी.एड.उत्तीर्ण केलं.याशिवाय चिवटे यांनी पत्रकारिता विषयात पदवी संपादन केली.एवढे शिक्षण घेऊन *ते* थांबले नाहीत.त्यांनी मुंबई येथील के.सी.कॉलेजमध्ये लॉ ची डिग्री संपादन केली.


विशेष म्हणजे चिवटेसरांना गडकिल्ल्यांचा प्रवास करून या विषयात संशोधन करण्याचा छंद असून त्यांनी आतापर्यंत ५० गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.तर पन्हाळगड ते पावनखिंड हा प्रवास गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने करत आहेत. खरं तर,कक्ष प्रमुख चिवटेसर हे गाढे शिवभक्त असून,शिवकालिन इतिहासाचे सच्चे अभ्यासक आहेत.खरं तर,त्यांना *इतिहासकार* म्हटलं तरी त्यात काही वावगं होणार नाही.


शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात काम करण्याआधी चिवटेसर यांनी स्टार माझा,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, साम टिव्ही,आयबीएन लोकमत अशा ख्यातनाम दूरचित्र वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले अन् त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर चिवटेसरांनी रुग्णसेवा करण्याचा संकल्प केला.याशिवाय २६/११ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अन् त्याप्रसंगी तत्कालिन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे सीएसटी स्टेशनवर झालेलं आगमन या थरांरक प्रसंगांची दृश्ये चिवटे़ंनी आपल्या कॅमेरात टिपली होती,हे त्यांच्या साहसीवृत्तीचं प्रतिक आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथील शिवमूर्तींना *अखंड पुष्पहार अर्पण उपक्रम* गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात आहे.शिव छत्रपतींच्या पुण्यस्थळांचे पावित्र्य अबाधित रहावे व त्यांचे वैभव अधिक तेजस्वी दिसावे,यासाठी येथील परिसर नित्यनेमाने स्वच्छ केला जातो.हे पवित्र कार्य डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.या अद्वितीय उपक्रमाची कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


राज्यातील गोरगरीब दिव्यांग बंधू-भगिनींना स्वावलंबी जीवन जगता यावे,या प्रांजळ उद्देशाने संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,आरोग्यदूत फाउंडेशन आणि रत्नविधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने *एकनाथ हीरक आरोग्य वर्ष म्हणून *मॉड्युलर हात व पाय मोफत बसविण्यात येत आहेत*.हे आरोग्य शिबीर ठाणे येथील आनंद आश्रम येथे दर महिन्याला शेवटच्या रविवारी आयोजित केले जाते.आजमितीपर्यंत सुमारे १५०० दिव्यांगांना याचा लाभ झाला असून,मंगेश चिवटेसर यांच्या देखरेखीखाली हे शिबीर कार्यान्वित होते.या शिबिरामुळे दिव्यांग बंधू-भगिनींना मोठा सुखद दिलासा मिळत असून, स्वतःच्या पायाने चालणं अन् स्वतःच्या हाताने कामं करणं त्यांना शक्य झालं आहे.वास्तवात यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाही.


वास्तविक पहाता,सर्वात महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत भोजन देणं तर,कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मोफत औषधांचे वाटप..परळ येथील टाटा हॉस्पिटल आणि के ई एम हॉस्पिटलच्या आवारात दर रविवारी सकाळी केले जाते.त्यामुळे राज्यातील अन् परराज्यातील रुग्ण अन् त्यांच्या नातेवाईकांची मोठी सोय होत असल्याचे सांगण्यात येते.हे समाजकार्य रुग्णदूत मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी आणि करुणा सेवा ट्रस्टचे स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच महिन्यांपासून इमानेइतबारे केले जात आहे.या सामाजिक उपक्रमाची सर्वच क्षेत्रांतून प्रशंसा होत आहे.


शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटेसर यांच्या अथक प्रयत्नांतून 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने मिळत आहेत,ही कौतुकास्पद गोष्ट आहे.त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सहाय्यता निधी,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष,श्री सिद्धिविनायक ट्रस्ट,लालबागचा राजा ट्रस्ट, टाटा ट्रस्ट,कारो ट्रस्ट,चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन,जय गणेश ट्रस्ट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.इतकेच नव्हे तर,स्व.आनंद दिघेसाहेब यांनी स्थापन केलेल्या जय अंबे मा ट्रस्ट आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या माध्यमातून 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट पात्र रुग्णांसाठी निधी उपलब्ध करून देतात.वरील सर्व योजनांचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचविण्यासाठी मंगेश चिवटे हे कक्षाचे प्रमुख या नात्याने निरंतर प्रयत्नशील असतात,जेणेकरून निराधार लोकांना आपली महागडी ऑपरेशन्स मोफत वा अल्प दरात करणे शक्य होऊ शकेल.गेल्या नऊ वर्षांत राज्यभरात सुमारे एक हजारहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांना मोफत औषधोपचार,विविध 

शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी व चष्म्यांचे वाटप केले आहे.


 मंगेश चिवटे यांचे कठोर परिश्रम,चिकाटी,रुग्णसेवेची दुर्दम्य इच्छा व गोरगरीब लोकांविषयी कणव असल्यामुळ त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून असंख्य रुग्णांचे कॅन्सर,ब्रेन ट्युमर,किडनी,लिव्हर इन् बोनम्यारो ट्रान्सप्लांट,बायपास,मोतीबिंदू, एजिओप्लास्टी,कोकलीयर इमप्लांट,लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रांचे ऑपरेशन,भाजलेले रुग्ण, अपघाती रुग्ण यांच्यावरील शस्त्रक्रिया ठाण्याच्या गंगुबाई संभाजीराव शिंदे मल्टिप्लिसिटी हॉस्पिटल,ज्युपिटर हॉस्पिटल,सिद्धी विनायक हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये मोफत पार पडल्या आहेत.वास्तविक पहाता,या सर्व रुग्णांना नवजीवन मिळून त्यांच्यात जगण्याची एक उमेद निर्माण झाली.या सर्वांचे आशिर्वाद व दुवा चिवटेसरांना मिळाली.खरं तर,यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाही.


संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटे व त्यांची टीम जे रुग्णसेवेचे अहम कार्य करत आहे,ते पुढील काळात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना व संस्थांना निश्चितच पथदर्शक ठरेल.चिवटेसरांच्या टीममध्ये प्रामुख्याने कक्षाचे राज्य प्रमुख राम राऊत,राज्य सहप्रमुख माऊली धुळगंडे,डॉ.निलेश देशमुख, अरविंद मांडवकर,प्रसाद सूर्यराव,रविंद्र ननावरे,राहुल भालेराव,सागर झाडे,स्वरूप काकडे,हृषिकेश देशमुख,भूषण सुर्वे,डॉ.शार्दुल भणगे,लक्ष्मण सुरवसे,विलास काळण,गजानन नारलावार,रोहित वायभासे,नितीन हिलाळ,गोविंदकुमार, शिवाकांत निषाद,भरत गोपाळे,दीपक गवळी,गोविंदकुमार, राजाभाऊ भिलारे आदी वैद्यकीय सहाय्यक,रुग्णसेवक यांचा समावेश आहे.चिवटेसरांच्या नेतृत्वाखाली हे सर्व

तनमनधनाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत,हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यासाठी गौरवास्पद आहे.


 आरोग्यदूत मंगेश चिवटेसर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी आनंद आश्रम येथे दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचे वाटप,तर रविवारी ठाणे(पू.) कोपरी येथील कमला हायस्कूलमध्ये सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कृपया चाहत्यांनी या कार्यक्रमांना अवश्य भेट देऊन मंगेशसरांना शुभेच्छा द्याव्यात,असे आवाहन करण्यात येते.


मित्रहो,वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीनुसार जात,धर्म,पंत,प्रांत अन् पक्ष याच्या पलीकडे जाऊन रुग्णदूत मंगेश चिवटेसर यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष 

तनमनधनाने लोकहिताचे काम करत आहे.शिंदेसाहेब हे स्वतःला (उपमुख्यमंत्री)डी सी एम नव्हे तर,*डेडिकेटेड टू कॉमन मॅन* मानतात. त्यांना कोणतेही पद असो वा नसो..ते बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक या भूमिकेतूनच संकटसमयी जनसामान्यांच्या मदतीला धावून जातात.त्यामुळेच त्यांना *अनाथांचे नाथ एकनाथ* असे जनमानसात संबोधिले जाते.


मुख्यत: ना.एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे सर्वेसर्वा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे सातत्याने मार्गदर्शनपर पाठबळ लाभत गेल्याने,चिवटेसर व त्यापरिने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला रुग्णसेवेत मोठं यश प्राप्त होत गेलं.विशेष म्हणजे अनाथांचे नाथ एकनाथ आणि डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वरदहस्तामुळे रुग्णदूत मंगेश चिवटेसर यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली व त्यातून त्यांचे जीवन खऱ्या अर्थानं सार्थक झालं आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.अत: आमचे मार्गदर्शक,स्नेही-मित्र  मंगेश चिवटेसर यांचे  मन:पूर्वक अभिनंदन अन्  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂🙏




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने