जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत आझाद मैदानावर विराट मोर्चा

 


जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत आझाद मैदानावर विराट मोर्चा 


मुंबई, ता. १ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे,रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप,भाकप माले,शेकाप,सकप, समाजवादी पक्ष,भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल, विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष - संघटनांनी केला आहे. याअंतर्गत २२ एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्यात आली होती . राज्यातील सर्व‌ जिल्ह्यात व एकूण ७८ ठिकाणी या विधेयकाचा निषेध करण्यासाठी मोर्चे, निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ बाबतीत सविस्तर अभ्यास करून या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीने तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला व राज्यात विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा, याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्यात आले आहे . याचाच भाग म्हणून ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. . तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार - प्रसार करुन, सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा, विधान परिषदेत स्पष्ट भूमिका घ्यावी म्हणून दबाव निर्माण करण्यात येणार आहे. सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे. राज्य भरातून १२२०० च्या वर हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. यावरून जनसामान्यांच्या मनात या विधेयकाबाबत काय आहे हे लक्षात येते. परंतु सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही. हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही. याचा आम्ही निषेध करतो. आमचे हरकतीचे मुद्दे सोबत जोडलेल्या टिपणात आहेत. थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची, सरकार ला लोकशाही मार्गाने जाब विचारणारे यांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे . म्हणून या विधेयकाच्या विरोधात ३० जून २०२५ रोजी मुंबई मधे जोरदार विरोध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सदर विधेयकाच्या विरोधात सर्व पत्रकार संघटनांनी देखील जोरदारपणे आवाज उठवला आहे . तरी सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आंदोलनाच्या ठिकाणी येऊन या गंभीर प्रश्नावर आपण सरकार व नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी सहकार्य करावे हे कळकळीचे आवाहन करीत आहोत आपले भाकप, माकप, शेकाप, भाकप माले, समाजवादी पक्ष,सकप, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल व जनआंदोलनाची संघर्ष समिती व सर्व लोकशाही पक्ष व संघटनांची जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती सोबत या विधेयकाला विरोध का करावा याची सविस्तर माहिती देत आहोत आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, वृत्त वाहिनीवर प्रसिद्धीसाठी द्यावे ही विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली परिषदेला भारत जोडो अभियान च्या उल्का महाजन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, कॉ प्रकाश रेड्डी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ डॉ एस के रेगे, शैलेंद्र कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे ॲड राजेंद्र कोरडे, कम्युनिस्ट पक्ष माले चे कॉ शाम गोहिल,कॉ विजय कुलकर्णी, ज्येष्ठ विधीज्ञ मिहीर देसाई, मुंबई कॉग्रेस चे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, आदी प्रमुख उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने