*प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, लौकी ता. शिरपूर*
शिरपूर, दि. १९ – केंद्र शासनाच्या जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत धरती आबा जन भागीदारी अभियानाची सुरुवात शिरपूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, लौकी येथे मोठ्या उत्साहात झाली. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध योजना आणि लाभांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय धुळे येथील सहायक प्रकल्प अधिकारी श्री. मनिष पाटकरी यांनी केले. त्यांनी आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली व शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "धरती आबा जन भागीदारी अभियानाचा उद्देश आदिवासी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य विषयक असा सर्वांगीण विकास करण्यात यावा.
या अभियानांतर्गत जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, घरकुल मंजुरी प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले आहे.कार्यक्रमाला गट विकास अधिकारी श्री. प्रदिप पवार ,तालुका कृषी अधिकारी श्री. संजय पवार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.