*किसान विद्या प्रसारक संस्थेत ११वा जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न...*

 



*किसान विद्या प्रसारक संस्थेत ११वा जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न...*

किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर व पतंजली योग समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा जागतिक योग दिवस कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई शिरपूर शाळेच्या प्रांगणात सकाळ सत्रात उत्साहात साजरी करण्यात आला. संपूर्ण मानवी जीवन हे निरोगी व प्रसन्न राहण्यासाठी योगाभ्यास ही काळाची नितांत गरज आहे; म्हणून योगाभ्यास विविध आसनांच्या अभ्यासातून विद्यार्थी, पालक व संस्थेच्या सर्व सेवकांकडून प्रात्यक्षिक पद्धतीने करून घेण्यात आला. पतंजली योग समितीच्या वतीने नियमित योग अभ्यास करण्यासाठी उपस्थित सर्व साधकांनी संकल्प केला. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे. म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस या कार्यासाठी नियोजित करण्यात आला आहे. भारतीय इतिहासात २०२५ वर्ष हे सैन्य दलातील महिलांच्या पराक्रमाचे वर्ष म्हणून संपूर्ण देशभरात अभिमानाने साजरे केले जाणार असून २१ जून रोजी शिरपूर परिसरातील सर्व महिलांना जागतिक योग दिनासाठी निमंत्रित करून गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. योग अभ्यासासाठी प्रमुख अतिथी म्हणून नासिक येथील योग शिक्षिका सौ. संगीता पाटील, माजी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, प्राचार्य डॉ. एस.एस राजपूत, प्राचार्य श्री पवार ,प्राचार्य श्री विलास चव्हाण , मुख्याध्यापक श्री नरेंद्र कापडे, मुख्याध्यापक श्री निलेश चोपडे, समन्वयक श्री सागर वाघ, क्रीडा विभागाचे सल्लागार  डॉ. लिंबाजी प्रताळे, प्रा.राधेश्याम पाटील, संस्थेच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनी, पालक वर्ग उपस्थित होते.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,पतंजली युवाभारत जिल्हा प्रभारी जितेंद्र शेटे,प.महिला जि.प्रभारी प्रतिभा शिसोदे भा.स्वा.ता.प्र.किशोर गुरव,योगगुरुजी भरत कदम, योगशिक्षक शशी भूषण मिश्रा 

,संघटक राजेंद्र चौधरी, महिला पतंजली समितीचे  मेघा बाविस्कर वंदना माळी, कुसुम बच्छाव संगीता देशमुख, वर्षा सूर्यवंशी, संगीता गिरासे, चित्रा पाटील, मीना पाटील, सोनल जाधव,  सुचिता महाले, सुनंदा सोनवणे, अनिता गिरासे, पुष्पा सोनवणे, वंदना बारी, नंदा सोनवणे, तसेच के व्ही टी आर सी बी एस ई शाळेचे शिक्षक -शिक्षकेतर बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने