सरपंच पदाचे आरक्षण बाबत शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ३० जून २०२५ रोजी नव्याने आरक्षण सोडत

 

सरपंच पदा


चे आरक्षण बाबत 

शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ३० जून २०२५ रोजी नव्याने आरक्षण सोडत


शिरपूर प्रतिनिधी - ग्रामविकास विभाग यांच्याकडे ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिरपूर तालुक्यात माहे एप्रिल २०२५ मध्ये ११८ ग्रामपंचायतींच्या २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानुसार पैसा क्षेत्रातील ५० ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात आले होते. पेसाव्यतिरिक्त असलेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता ४ ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता १४ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता १८ ग्रामपंचायती तर उर्वरित ३२ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आली होती.


तथापि, ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांचेकडील दिनांक १३ जून २०२५ रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.


त्यानुसार मा. जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडिल दि. १७ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार, शिरपूर तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा दिनांक ३०/६/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. सुधारित आरक्षणानुसार, पेसा क्षेत्रातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात येणार आहे. पेसाव्यतिरिक्त असलेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता ४ ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता १४ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता १९ ग्रामपंचायती तर उर्वरित ३१ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात येणार आहेत. सदर आरक्षण सोडल सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहणेबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने