छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मांडळ येथे संपन्न!* *महसूल विभागाकडून विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप!*

 


*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर  मांडळ येथे संपन्न!*


*महसूल विभागाकडून विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप!*



शिरपूर तालुक्यातील  करवंद परिमंडळ अंतर्गत मौजे मांडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. 

               शासनाकडून राबविल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मांडळ येथे पार पडले.  या प्रसंगी महसूल विभागाच्या वतीने जातीचे दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थींना मंजुरी आदेश, मोफत वाळू वाहतूक परवाना वाटप, जिवंत सातबारा ईत्यादींचे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, तहसीलदार शिरपूर मा. श्री महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार, माजी जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महसूल नायब तहसीलदार श्री महेश साळुंखे, पुरवठा निरीक्षक श्री ठाकरे, मांडळचे ग्राम विस्तार अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य  यतीश सोनवणे,  माजी सरपंच सुनील सोनवणे, मंडळ अधिकारी करवंद व मंडळ भागातील सर्व तलाठी आणि इतर कर्मचारी तसेच लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करवंद मंडळ विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच 

मांडळ ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले

मनोगत - 

शिरपूर तालुका प्रत्येक योजना राबवणारा एकमेव तालुका आहे छत्रपती शिवरायांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजची महाराष्ट्र शासन जनहितासाठी काम करत आहे तालुक्यातील जनतेने अधिकाधिक योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान करतो. 

आमदार - काशीराम पावरा, शिरपूर विधान सभा 


 

सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे. जनतेच्या तक्रारी तत्पर निकाली काढणे., महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करून सर्वसामान्य जनतेला प्रकाशाच्या वाटा दाखविणे हा एकमेव उद्देश महसूल विभागाचा आहे.

महेंद्र माळी- तहसीलदार शिरपूर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने