🔥 महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन यशस्वी! शेतकऱ्यांचे हक्क, हमीभाव आणि जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याचे 30 ठराव मंजूर! 🔥

 


🔥 महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन यशस्वी! शेतकऱ्यांचे हक्क, हमीभाव आणि जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याचे 30 ठराव मंजूर! 🔥


नाशिक येथे दिनांक 24 जून 2025 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांचे हक्क, वनजमीन वापराचा अधिकार, हमीभावाचा कायदा आणि जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासंदर्भात एकूण 30 ठराव मंजूर करण्यात आले.

या अधिवेशनात 74 राज्य कौन्सिल सदस्यांची निवड झाली, तसेच 21 सदस्यांची राज्य कार्यकारणी स्थापन करण्यात आली.महत्त्वाचे म्हणजे, राज्य सेक्रेटरीपदी अँड. सुभाष लांढे (अहमदनगर) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.प्रा. काॅ. राजे देसले (नाशिक), काॅ. शाम काळे (नागपूर) यांचाही समावेश या नेतृत्वात आहे.

धुळे जिल्ह्यातून अँड. काॅ. हिरालाल परदेशी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली, तसेच धुळे जिल्हा सचिव म्हणून त्यांची राज्य कौन्सिलमध्येही निवड करण्यात आली.या अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले.

प्रतिनिधी म्हणून अँड. हिरालाल परदेशी, काॅ. वसंत पाटील, काॅ. साहेबराव पाटील, अँड. संतोष पाटील, बुधा मला पावरा, सतिलाल रतन पावरा, बापु गर्दै, सौ. मालती इंदवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या ऐतिहासिक अधिवेशनासाठी नाशिकमधील काॅ. राजु देसले यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रमपूर्वक नियोजन करून अधिवेशन यशस्वी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने