शिरपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण*
*लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्काराचे आयोजन*
*मान्यवरांच्या हस्ते होणार प्रातिनिधीक स्वरुपात चावी वाटप*
*धुळे, दिनांक 2 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :* केंद्रीय मंत्री, ग्रामीण विकास, कृषी व विकास कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम 3 जून, 2025 रोजी दुपारी 3 वाजता बालेवाडी, पुणे येथे होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आर. सी. पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस.एस.पटेल मेमोरियल हॉल, करवंद नाका जवळ, शिरपूर येथे दुरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे. अशी माहिती शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मा.केंद्रिय मंत्री, ग्रामीण विकास, कृषी व विकास कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमास उप मुख्यमंत्री, मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
शिरपूर येथील कार्यक्रमास 500 लाभार्थ्याना थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांना ‘आवास मित्र’ ॲपचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तरी या सोहळ्यास तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.पवार यांनी केले आहे