शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ₹3.60 लाख किंमतीच्या 9 चोरीच्या मोटारसायकलींसह 2 आरोपी अटकेत
शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने दोन चोरट्यांना अटक करत तब्बल ₹3,60,000/- किमतीच्या 9 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून, यामध्ये शिरपूरसह इतर भागातील चोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे शिरपूर शहरात गेले काही महिने सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसला आहे.
गुन्ह्याचा तपशील:
दि. 8 मे 2025 रोजी रात्री 8:30 ते 9 मे रोजी सकाळी 7:30 च्या दरम्यान प्रल्हाद तात्या नगर, 80 फुटी रोड, शिरपूर येथून राधेश्याम रमेश पाटील या इसमाची काळ्या व केसरी रंगाची बजाज पल्सर NS125 दुचाकी (MH 19/ED 8410) चोरीस गेली होती. यासंदर्भात शिरपूर शहर पो.स्टे. येथे गुन्हा क्रमांक 296/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवून संभाव्य संशयितांचा शोध सुरू केला. 5 जून रोजी वरझडी रोडवर पेट्रोलिंगदरम्यान दोन इसम – दिनेश आपसिंग पावरा (वय 22) व विशाल सचिन भिल (वय 22), दोघेही रा. वाडी, ता. शिरपूर हे एक विना नंबरची काळी-केसरी रंगाची पल्सर दुचाकी घेऊन फिरताना सापडले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
सखोल चौकशीत सदर दुचाकी ही आधी दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात दोघांनी शिरपूरसह इतर ठिकाणांहून चोरलेल्या आणखी 8 दुचाक्या वाघाडी व तेवाडी गावांदरम्यान एका कोरड्या नाल्याजवळ लपवून ठेवलेल्या असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने पंचासमक्ष सर्व 9 दुचाक्या जप्त केल्या.
जप्त दुचाक्यांची माहिती (एकूण किंमत: ₹3,60,000/-):
या कारवाईनंतर सदर आरोपींना न्यायालयात हजर करून 7 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रविंद्र आखडमल करत आहेत.
महत्त्वाचे योगदान:
या उल्लेखनीय कारवाईत पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, डी.बी. पथकाचे प्रमुख पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, विलास कोळी, सचिन वाव, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटु साळंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, दादाभाई बोरसे, रविंद्र महाले यांनी अत्यंत प्रभावी सहभाग नोंदविला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शिरपर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची कामगिरी
(३,६०,०00/- रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या ९ मोटार सायकलींसह २ आरोपी जेरबंद)
शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं.२९६/ २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्ह्यतील फियांदी-
राधेश्याम रमेश पाटील वय २१ व्यवसाय शिक्षण रा.खादगाव ता.जामनेर जि.जळगाव ह.मु प्रल्हाद तात्यानगर, ० फुटी रोड
शिरपुर जि.धुळे यांनी फियांद दिली की, दि.o८/०५/ २०२५ रोजी रात्री ०८.३o ते दि.०९/०५/ २०२५ रोजी सकाळी ०७.३०
वबाजेचे दरम्यान शिरपूर जि.धुळे शहरातील प्रल्हाद तात्या नगर., ८0 फुटी रोड येथील मेघा लक्ष्मण जाधव यांचे राहते
घरासमोर रस्त्यावर फि्यांदी यांनी त्यांची बजाज कंपनीची काळया व केसरी रंगाची पल्सर एन.एस.१२५ मो.सा.कर.
एम.एच.१९/ ईं.डी.८४१० ही हॅण्डल लॉक करून उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत
दिलेल्या तक्रारी वरून वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्र.किशोरकुमार परदेशी यांनी वेगाने तपासचक्रे फिरुन गुन्द्यतील चोरीस
गेला माल व अज्ञात चोरट्याचा शोध घेणेबाबत गुन्हेशोध पथकास आदेशित केले.
दि.०५/०६/२०२५ रोजी शोध पथकाचे अंमलदार शिरपूर जि.धुळे शहरात पेट्रोलिंग करीत असतांना वरझडी रोड,
शिरपूर जि.धुळे येथे २ इसम हे त्यांचे ताब्यातील बजाज कंपनीची विना क्रमांकाची काळया व केसरी रंगाची पल्सर
एन.एस.१२५ मॉडेलचे मो.सा.वर संशयीतरित्या फिरतांना दिसल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे
नाव-१) दिनेश आपसिंग पावरा वय २२व२) विशाल सचिन भिल वय २२ दोन्ही रा.वाडी ता.शिरपुर जि.धुळे असे
असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचे ताब्यातील मो.सा.बाबत विचारपूस करता ते उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सदर
मो.सा.बाबत त्यांचेकडे चौकशी करणे असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले वत्यांचे ताब्यातील
मो.सा.चे चेचीस नंबर व इंजिन नंबरची खात्री केली असता सदरची मो.सा. शिरपूर शहर पो.स्टे.गुरनं.२९६/२०२५ भारतीय
न्याय संहिता २०२३ K कलम ३०३(२) प्रमाणे गन्ह्यातील चोरीस गेला माल असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सदरची
मो.सा.संगणमताने चोरी केल्याची कबुली दिल्याने ते सदर गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत.
त्यानंतर वरनमुद दोन्ही आरोपीतांना गुन्ह्यात अटक केली असता त्यांना दि.०७/%६/२०२५ रोजी पावेतो पोलीस
कस्टडी रिमांड मंजुर आहे.
वरनमुद् आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपूस करता त्यांनी शिरपूर जि.धुळे शहरातुन तसेच इतर टिकाणांहुन
चोरी केलेल्या मो.सा.लपवन ठेवल्या असल्याचे सांगितल्याने दोन पंचांसमक्ष सदरच्या मो.सा. वाघाडी तेवाडी गावाचे
दरम्यान कोरड्या नाल्याचे किणाऱ्याहन जप्त केल्या असन जप्त केलेल्या मो.सा.चे वर्णंन व किंमत खालील प्रमाणे
एकुण ३,६०,000/- रूपये किमतीच्या विविध कंपनीच्या ९ मो.सा.
यण प्रमाण वराल वणनाच्या ₹.६०,00/- रूपय किमताच्या एकुण ९ मा.सा.सदर गुन्ह्यात जप्त करून शरपुर शहर
पो.स्टे गुरंन २९६२०२५ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणे व पानसेमल पो.स्टे जि.बडवाणी गु.र.न ३२८/२०२२
भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे असे २ गुन्हे शिताफीने उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मा.पोनि श्री किशोरकुमार परदेशी सो यांचे मार्गंदर्शनाखाली
पोहेकॉ ।रविंद्र आखडमल हे करीत आहेत
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधक्षक श्र.किशोर काळे तसेच
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल गोसावी यांचे मार्गंदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरी्षक
श्री.किशोरकुमार परदेशी, डी.बी.पथकाचे पोहेकॉ राजेद्र रोकडे, रविं्र आखडमल, पोकॉ सोमा ठाकरे, आरीफ तडवी,
विलास कोळी, सचिन वाव, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटु साळंके, प्रशांत पवार, मनोज महाजन.
मनोज दाभाडे, दादाभाईं बोरसे चापोकॉ रविद्र महाले अशांनी मिळुन केली आहे.