व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत : पत्रकारितेच्या नवयुगाचा आरंभ!

 


‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत : पत्रकारितेच्या नवयुगाचा आरंभ!

नवी दिल्ली :

देशभरातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या आणि पत्रकारितेच्या मूल्यांना बळ देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन यंदा २० व २१ मे २०२५ रोजी नवी दिल्लीत होणार आहे. नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग येथे हे अधिवेशन भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.

या दोन दिवसांच्या अधिवेशनात देशभरातील राज्य अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस सहभागी होणार असून पत्रकारितेच्या सध्याच्या स्थितीवर, आव्हानांवर आणि भविष्यकालीन दिशा यावर सखोल चिंतन होणार आहे. त्याआधी १८ व १९ मे रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची चिंतन बैठक पार पडेल.

या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष मा. संदीप काळे भूषवणार असून कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री मा. मनसुख मांडविया, मा. किंजरापू राम मोहन नायडू, मा. जितनराम मांझी, मा. राज भूषण चौधरी, माजी गृहमंत्री मा. शिवराज पाटील चाकूरकर, पुडुचेरी विधानसभेचे अध्यक्ष मा. एम्बालम सेल्वम, आणि ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांचा समावेश आहे.

पत्रकार प्रशिक्षण सत्राचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोच व सायकोलॉजिस्ट ऊर्जा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनात विशेष पुरस्कार समारंभ होणार असून मा. भाऊसाहेब वाघचौरे (खासदार) यांना संसद भूषण पुरस्कार, मा. समीर कुणावार (आमदार) यांना विकास पुरुष पुरस्कार, मा. अनघा सराफ यांना उद्योग रत्न पुरस्कार, मा. वेंकटेश जोशी यांना समाज रत्न पुरस्कार, आणि मा. डॉ. पंजाब खानसोळे यांना विकास रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन गगन महोत्रा (राष्ट्रीय प्रमुख), दिव्या भोसले (राष्ट्रीय सरचिटणीस), अशोक वानखेडे (राष्ट्रीय संयोजक), चेतन बंडेवार (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

प्रत्येक राज्याचे अध्यक्ष आणि महासचिव आपापल्या राज्यातील पत्रकारितेतील कार्य, उपक्रम व भविष्यातील दिशा यांचा अजेंडा अधिवेशनात सादर करणार आहेत. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अनिल म्हस्के (राज्याध्यक्ष) व दिगंबर महाले (राज्य महासचिव) करणार आहेत.

या संदर्भात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे म्हणाले,

> “गेल्या तीन वर्षांपासून आमचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतच होत आहे. याच मंचावरून पत्रकारिता आणि पत्रकारांविषयीचा राष्ट्रीय दृष्टिकोन ठरतो. पत्रकारांवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची ताकद अधोरेखित होते.”

या अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने