पालक संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शाळेने हजारो मुलांचे रोखून धरलेले निकालपत्र व दाखले पालकांना मिळाले

 



पालक संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शाळेने हजारो मुलांचे रोखून धरलेले निकालपत्र व दाखले पालकांना मिळाले 


 


नाशिक- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक हि शाळा १००% अनुदानित शाळा असतांना हि माहिती शाळा व संस्था प्रशासन यांनी पालकांपासून अनेक वर्षांपासून लपवून ठेवलेली होती. व पालकांकडून बेकायदेशीरपणे ७५०० रुपये वसुली शाळा व संस्था करीत आहे. तसेच आदर्श शिशु विहार उत्तम नगर सिडको नाशिक हि विनानुदानित शाळेत मागील वर्षापासून बेकायदेशीरपणे १५०० रुपयांची वाढ करून ५५०० रुपये फी पालकांकडून वसूल केली जात आहे, म्हणून सर्व पालकांनी एकमताने बेकायदेशीर फी भरायची नाही असे ठरवले होते.


      १ मे रोजी शाळेचा निकालाचा दिवस होता सर्व पालक शाळेंत मुलांचे निकालपत्र घेण्यासाठी जमले होते. परतू शाळा व संस्था प्रशासन यांनी पालकांना आधी शाळेची फी भरा व निकाल घेऊन जा असे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी सांगितले. शाळा १००% अनुदानित आहे मग शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या निर्णयावर पालक ठाम होते. पालकांनी ठिय्या आंदोलन करून शाळा व संस्था प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.


      शाळेतील सर्व पालक शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेऊन पालकांवर झालेल्या अन्यायाची आपबिती सांगितली. उपसंचालकांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी शाळेला खडसावून सांगितले आहे कि महाराष्ट्र शैषणिक संस्था ( कॅपिटेशन फी घेण्यास विरोध) अधिनियम १९८७, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११, व त्या खालील नियमावली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०१६, नियमावलीमधील तरतुदी नुसार पालकांना त्वरित मुलांचे गुणपत्रक द्यावे, दाखले देण्यात यावेत पुढील वर्षाचे प्रवेश नियमित देण्यात यावेत शाळेने असे न केल्यास पालकांनी शाळा व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्यास त्यास शाळा व संस्था प्रशासन जवाबदार राहील असे आदेशात म्हटले आहे.


      शनिवारी दिनांक – १७/०५/२०२५ रोजी पुन्हा शेकडो पालक शाळेत एकत्र येऊन शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशाची प्रतच शाळेला दिली म्हणून शाळेने शाळेवर व संस्थाचालकांवर संतप्त पालक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करतील या भीतीने सर्व पालकांना विद्यार्थ्यांचे निकालपत्र व दाखले दिले जातील असे सांगितले पालकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे शाळा प्रशासनाला नमते घ्यावे लागले व पालकांना दाखले व निकालपत्र मिळायला सुरवात झाली आहे.


      परतू शाळेच्या मुख्याद्यापिका ज्योती पवार यांनी पालकांना धमकी दिली आहे तुम्हाला पुढील वर्षाचे प्रवेश मिळणार नाहीत. तुमच्या मुलांचे प्रवेश संस्था चालक व सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील तरच आम्ही तुमच्या मुलांना शाळेंत प्रवेश देऊ. म्हणून सर्व पालकांनी अंबड पोलीस स्टेशन गाठून तेथील पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना तक्रार अर्ज देऊन शाळेने व संस्थेने शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशाचे उलघन केले आहे म्हणून शाळेवर व संस्थेवर गुन्हे नोंदवण्यात यावेस असे निवेदन दिले आहे. या वेळी पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, संदीप गांगुर्डे, किरण गायकवाड, पुष्पेंद्र महाजन, राजू चौधरी, धनराज वाघ, शिवाजी जाधव, शोभा नारखेडे, सचिन मते, समाधान देवरे, धनराज पाटील, अश्विनी पाटील, अश्विनी हाके, कविता शिंदे, खुशाल मटाले, स्वाती सोनवणे, वैशाली सूर्यवंशी, सुनील कर्डिले, किरण पाटील, या सह शेकडो पालक उपस्थित होते.


 


 


                                                      

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने