अजितदादा पवार यांच्याहस्ते डॉ मनोज महाजन यांचा जाहीर प्रवेश

 



अजितदादा पवार यांच्याहस्ते डॉ मनोज  महाजन  यांचा  जाहीर  प्रवेश 


 शिरपूर वार्ताहर दिनांक 3 मे रोजी मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय यशस्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित दादा पवार यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळे जिल्ह्याचे शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ मनोज महाजन व विधानसभा प्रमुख अमृताताई महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी नामदार अजितदादांनी महाजन यांच्या कामांचे कौतुक करत भविष्यात पक्ष वाढवण्यासाठी तसेच जनतेचे काम करण्यासाठी परिश्रम घेणे , तसेच  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तयारीचा सल्ला देत पक्षात आपले हार्दिक स्वागत व अभिनंदन केले 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री इंद्रनील नाईक पक्षाचे सचिव आमदार शिवाजीराव गरजे माजी मंत्री आमदार अनिल पाटील प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे वरिष्ठ नेते किरण शिंदे किरण पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील शहरकाराध्यक्ष युवराज राजपूत युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने