लघुपट ही काळाची गरज आहे़ आणि कमी वेळेत लघुपटाचा विषय लोकांपर्यंत कसा पोहोचला जावा या आशयाचे लघुपट बनणे ही आताची खरी गरज आहे़..! -- *(ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक प्रदीप कबरे यांचे प्रतिपादन)*
मुंबई-परेल (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
आर्यारवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिशुविकास हॉल, बेस्ट वसाहत, राजकमल स्टुडिओ जवळ, परेल येथे सिने-नाट्य क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सर्व विजेत्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक प्रदीप कबरे, सही रे सही नाटक फेम विनोदी अभिनेते जयराज नायर, प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, शिर्के प्रतिष्ठानचे अँड सुनिल शिर्के, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटील, प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, कांचन पगारे आदी मान्यवर यांच्या हस्ते सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून काश्मीरमधिल दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली. आर्यारवी एंटरटेनमेंटचे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार आणि प्रसिद्ध अभिनेता सागर सातपुते यांच्या अस्खलित सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या सर्वश्री अरुण होर्णेकर, मनोहर आचरेकर, निलांबरी खामकर, प्रदीप कबरे, लक्ष्मण गुरव आणि जयंत घाटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या अतिथिय भाषणात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते प्रदीप कबरे यांनी *लघुपट ही काळाची गरज आहे़ आणि कमी वेळेत लघुपटाचा विषय लोकांपर्यंत कसा पोहोचला जावा या आशयाचे लघुपट बनणे ही आताची खरी गरज आहे़ आणि अशाच लघुपटांचे आयोजन महेश्वर तेटांबे आपल्या आर्यारवी एंटरटेनमेंट च्या माध्यमातून करतात हे विशेष आहे
याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण, कलाभूषण, रंगकर्मी, समाजरत्न, युवा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. निवेदक अनिल सुतार आणि सागर सातपुते यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात कै.भिकाजी महादेव तेटांबे कै.मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ "शाश्वत" (प्रथम विजेता) रोख रक्कम 25 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, लोकनेते कै.विठ्ठलदादा खाडे आणि कै. सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ "शूलेस" (द्वितीय विजेता) रोख रक्कम 15 हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, "प्रपोजल" (तृतीय विजेता) रोख रक्कम 10 हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, "चटका" (उत्तेजनार्थ विजेता) रोख रक्कम 5 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच इतर काही उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक पारितोषिके कै.शामराव नारायण व्हटकर, कै. हौसाबाई शामराव व्हटकर, कै गीता आनंदा जाधव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आली. तसेच संस्थापक -अध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपनकर यांच्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून, खलील शिरगांवकर, आणि अँड.सुनिल शिर्के, प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता यांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संकलक आणि दिग्दर्शक राजवीर आनंदा जाधव यांनी विशेष मेहनत घेऊन आपलं मोलाचं योगदान दिले. सिने ग्राफिक डिझायनर मनिष व्हटकर, अभिनेता सुरेश डाळे, निर्माते, दिग्दर्शक आनंद खाडे, प्रनेश लोगडे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता, प्रसिद्ध अभिनेते रवी मोरे, बाळा चौकेकर, निलेश घाडी तसेच सिनेरामा प्रॉडक्शन चे राम माळी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. शिरोडकर हायस्कूल 1988 दुपार अधिवेशन च्या मित्रपरिवार यांनी (देवेंद्र पेडणेकर, अजीत साकरे सुरेश गुरव, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, मिनार अनिल म्हापणकर, विनायक हळदणकर आणि संदिप चव्हाण) यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध निर्माते,दिग्दर्शक आनंद खाडे यांनी उपस्थित रसिक आणि मान्यवरांचे आभार मानले.