दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाची गुजरात राज्यात सहल संपन्न. वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर

 



दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाची गुजरात राज्यात सहल संपन्न.


वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर

दोंडाईचा येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाची दि.२७ एप्रिल २०२५ रोजी एक दिवसीय गुजरात राज्यातील अध्यात्मिक श्रद्धा स्थळांना भेट देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदिवासी विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीमान तुकाराम वाडीले साहेब यांच्या नेतृत्वात सहल आयोजित करण्यात आली होती.

       सदर सहली दरम्यान गुजरात, राज्यातील सातपुड्याच्या वन परिसरातील आदिवासी समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्यात आली. यानंतर सरदार सरोवर परिसरातील लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य दिव्य पुतळ्याला भेट देण्यात आली. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकतृत्वाच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.

       दुपारच्या सत्रात हिंन्दू समाजाचे अमावस्या निमीत्त श्रद्धास्थान असलेल्या कुबेर भंडार महाराजांच्या मंदिराला भेट देण्यात आली. नर्मदा नदीच्या पवित्र पात्रात सहलीत उपस्थित जेष्ठांनी स्नान करून नर्मदा नदीच्या पवित्र जलाची व कुबेर भंडार महाराजांची मनोभावे पुजा अर्चा केली.

           संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान नर्मदेच्या काठावर स्थित  अध्यात्मिक क्षेत्रातील श्रद्धास्थान "निळकंठ धामचा" परिसरातील सर्वच भव्य दिव्य मंदिरांचे दर्शन घेण्यात आले. सदर मंदिरांना रंगबेरंगी लायटींगने सजवलेल्या परिसरातील अध्यात्मीक वातावरणात जेष्ठांनी भटंकती केली. खरोखरच सदर स्थळांना अध्यात्मीक क्षेत्रांची आवड असलेल्या प्रत्येक जेष्ठ बंधू भगिणींनी भेट द्यावी असे भव्य दिव्य क्षेत्र आहे. असे उदगार सहली दरम्यान भेट देणाऱ्या जेष्ठांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दोंडाईचा येथून पहाटे ४ वाजता मार्गस्थ झालेली सहल रात्री उशीरा दोन वाजता दोंडाईचा येथे समाप्त झाली.

          सदर सहलीत सहभागी सदस्यांनी सहली दरम्यान आलेल्या सुखद अनुभवाने समाधान व्यक्त केले. आणि दादासाहेब जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारींनी आयोध्या येथील राम मंदिराला भेट देण्यासाठी सहल आयोजित करावी, अशी मागणी व अपेक्षा व्यक्त केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने