धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वाची सूचना – उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी जनतेने घ्यावी काळजी

 



धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वाची सूचना – उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी जनतेने घ्यावी काळजी


धुळे (प्रतिनिधी):

राज्यभरात वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेसाठी विशेष सूचना जारी केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.तपमानात झालेली वाढ लक्षात घेता खालील काळजी घेणे आवश्यक आहे:


1. सकाळी १२.०० नंतर ते दुपारी ४.०० या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

2. शक्य असल्यास घरातच थंड जागी राहा.

3. अंगावर हलके, सैलसर व सूती कपडे परिधान करा.

4. डोकं, कान व मान झाकण्यासाठी टोपी, रुमाल वापरा.

5. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

6. उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी सावलीत थांबे घेऊन विश्रांती घ्यावी.

7. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी जास्त काळ उन्हात जाणे टाळावे.

8. ऊन लागल्यास शारीरिक त्रास झाल्यास तात्काळ नजीकच्या दवाखान्यात संपर्क साधावा.

9. लिंबू सरबत, ओआरएस सारखे द्रवपदार्थ सेवन करावेत.

10. मद्यपान व धूम्रपान टाळा.

      धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे ही सूचना देण्यात आली असून, सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने ती गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही उपाययोजना केवळ वैयक्तिक सुरक्षेसाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वाची आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने