शिरपुर तालुक्यात 70 लाखांचा गांजा जप्त – जंगलात खड्ड्यात लपवलेल्या अमली पदार्थावर पोलिसांचा धडक छापा!

 



शिरपुर तालुक्यात 70 लाखांचा गांजा जप्त – जंगलात खड्ड्यात लपवलेल्या अमली पदार्थावर पोलिसांचा धडक छापा!

शिरपुर (ता. 2 मे) – शिरपुर तालुक्यातील रोहिणी शिवारात जंगलात खड्ड्यात लपवलेला तब्बल 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा शिरपुर पोलिसांनी धडक कारवाईत जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक 01 मे 2025 रोजी 13.30 वाजेच्या सुमारास, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भाईदास जगतसिंग पावरा (रा. लाकडया हनुमान) व बाटा अमरसिंग पावरा (रा. रोहिणी) या दोघांनी रोहिणी शिवारातील जंगलात खड्डे खोदून त्यात गांजा लपवून ठेवला आहे.


मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मौखिक आदेशानंतर, पोलिसांनी सरकारी पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर यांना सोबत घेत धडक छापा टाकला. घटनास्थळी पोहोचताच दोन्ही आरोपी पोलिसांना पाहून पळू लागले, मात्र त्यांना पाठलाग करून अटक करण्यात आली. पंचासमक्ष चौकशीत त्यांनी गांजा लपवलेली जागा दाखवली.


पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने माती खोदली असता, जमिनीत पत्रे टाकून त्याखाली 34 पत्रटी कोठ्यांमध्ये सुका गांजा आढळून आला. तो 40 गोण्यांमध्ये प्रत्येकी 25 किलोप्रमाणे व एका गोणीत 10 किलो अशा एकूण 1010 किलो गांज्याची उलाढाल असल्याचे स्पष्ट झाले.


एकूण किंमत – 70,70,000 रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


या प्रकरणी शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नं. 130/2025 नुसार एन.डी.पी.एस. कायदा 1985 च्या कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 22(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना 2 मे रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने 5 मे 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.


हीसदर कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे, श्री किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. सुनिल गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल बसावे, पोसाई मिलींद पवार, पोहेकी संतोष पाटील, पोहेको  सागर ठाकुर, पोहेको/ संदीप टाकरे, पोहेको/ रमेश माळी, पोहेकी  अल्ताफवेग मिझो, पोकी/ धनराज गोपाळ, पोकों/योगेश मोरे, पोकी/ सुनिल मोरे, पोकों/ संजय भोई, पोकी/ ग्यानसिंग पावरा, पोकों/ प्रकाश भिल, पोकों/ दिनकर पवार, पोकों/ वाला पुरोहित, पोकों/  रणजित वळवी, पोकों/ मनोज नेरकर, चापोकों/ सागर कासार अशांनी केली आहे.


या कारवाईमुळे तालुक्यातील अमली पदार्थांचे जाळे उघड झाले असून, पुढील तपास सुरू आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने