शिरपूर तालुक्यात थाळनेर भाजपच्या मंडळ अध्यक्ष पदावर वीरपाल राजपूत यांची निवड ग्रामपंचायत अजंदे मित्र परिवाराकडून सन्मान सोहळा

 



शिरपूर तालुक्यात थाळनेर भाजपच्या मंडळ अध्यक्ष पदावर वीरपाल राजपूत यांची निवड 


ग्रामपंचायत अजंदे मित्र परिवाराकडून सन्मान सोहळा 



शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात आपले पायमुळे घट्ट करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे बळ मजबूत करण्यासाठी तालुका कार्यकारणी व विविध पदांची निवड नुकतीच जाहीर केली. यात  शिरपूर शहर अध्यक्ष व चार मंडळ अध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली.


ही निवड पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार अमरीश भाई पटेल, मा. भूपेश भाई पटेल, आमदार काशिनाथ पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाने जाहीर करण्यात आली.


यात होळनांथे येथील सामाजिक कार्यकर्ते, मा. चिंतन भाई पटेल यांचे विश्वासू कार्यकर्ते विरोपाल अमृत सिंह राजपूत यांची भारतीय जनता पार्टीच्या थाळनेर मंडळ अध्यक्ष पदी बिनविरोध निवड जाहीर केली आहे.


या परिसरातील अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करताना कार्यकर्त्यांची दाखवलेली निष्ठा, नेते प्रति असलेली आपली श्रद्धा, समाजाप्रती असलेली जान, पक्षनिष्ठा , व आजवर केलेली सामान्यांची सेवा, याची प्रतीक म्हणून वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना या राजकीय पदाची जबाबदारी दिली.


त्यामुळे या परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य संचारले असून युवक पक्षाच्या कामाला लागले आहेत. तसेच त्यांच्या या निवडीबद्दल गाव परिसरातून त्यांच्या स्वागताची विविध बॅनर लागले असून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षा होत आहे. 


आपल्याच भूमिपुत्रांच्या या गौरवाच्या सन्मान करण्यासाठी आजंदे ग्रामपंचायतचे गटप्रमुख चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 26 रोजी सायंकाळी विरोपाल राजपूत यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळेस गाव परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांना सन्मानित केले. यावेळी चंद्रकांत पाटील, किरण सिसोदिया, प्रदीप वारुळे, ओमेंद्र राजपूत, रितेश राजपूत ,रोशन पाटील, शुभम राजपूत, तुळशीराम मराठे योगेश पाटील, नितीन राजपूत, यासह गाव परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वारुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वीरपाल राजपूत यांनी केले. 

यावेळी वीरप्पन राजपूत यांच्यावर प्रेम करणारे मित्र मंडळ आप्तेष्ट समाजबांधव व राजकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना  वीरपाल राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातील व्यक्तीला इतक्या मोठ्या पदाची जबाबदारी दिली, माझ्या राजकीय सन्मान केला, आणि या निमित्ताने मला जनतेचे आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व रजिस्टर नेत्यांची आभार व्यक्त करतो आणि मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून निष्ठेने व सध्या मी पक्षाचे काम करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने