शिरपूर ब्रेकिंग न्यूज जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्णय : असली तांडा ग्रामपंचायतीवर अपात्रतेची गदा, सहा सदस्य व उपसरपंच पदच्युत

 



शिरपूर ब्रेकिंग न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्णय : असली तांडा ग्रामपंचायतीवर अपात्रतेची गदा, सहा सदस्य व उपसरपंच पदच्युत


प्रतिनिधी | शिरपूर


शिरपूर तालुक्यातील असली तांडा ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या निर्णायक आदेशामुळे नऊ सदस्यांची ग्रामपंचायत अचानक रिकामी झाली आहे. सहा सदस्य व उपसरपंच यांना जात पडताळणी प्रमाणपत्र न सादर केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.


ज्यांनी ग्रामस्थांच्या विश्वासावर निवडून येऊन त्यांची सेवा करायची होती, तेच सदस्य आवश्यक कागदपत्रे न सादर करता अपात्र ठरत असल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. हा फक्त कायदेशीर निर्णय नसून लोकशाही प्रक्रियेत झालेली एक मोठी दुर्घटना आहे.


तक्रारदार विनोद छगन करणकाळ (रा. हिसाळे ता. शिरपूर) यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सदस्यांनी निवडून आल्यापासून तीन वर्षे उलटूनही शासनाच्या आदेशानुसार सहा महिन्यांत आवश्यक जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. सुनावणी दरम्यानही हे प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पापळकर यांनी कडक आदेश देत सहा सदस्य व उपसरपंच यांना पदावरून अपात्र घोषित केले.


अपात्र सदस्यांची नावे —


1. श्रीमती रुपाली सुनील कोळी



2. श्रीमती अनिता असाराम कोळी



3. श्रीमती हिराबाई भिका कोळी



4. श्री नूरसिंग ओंकार पावरा



5. श्री राजेंद्र बाबूराव धनगर



6. श्री उखडू गुलाब भिल (उपसरपंच)




या खटल्याचे कामकाज अॅड. एस. व्ही. पटेल यांनी पाहिले.



या निर्णयामुळे ग्रामपंचायत शून्य स्थितीत गेली असून, गावातील अनेक विकासकामे व निर्णयप्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता असून, हा निर्णय कडक असला तरी ग्राम राजकारणातील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करणारा निर्णय आहे.


हा निर्णय एकीकडे प्रशासनाच्या कणखरतेचा परिचय देतो, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्यांकडे घेतलेली दुर्लक्षही अधोरेखित करतो. अपात्र सदस्यांवर कारवाई ही कायद्यानुसार योग्य असली, तरी तिचे पडसाद गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनावर उमटणार हे नक्की. ग्रामपंचायतीच्या रिकाम्या खुर्च्या केवळ सदस्यच नव्हे, तर संपूर्ण गावाला अडचणीत टाकणाऱ्या ठरल्या आहेत.


आता या ग्रामपंचायतीसाठी नव्याने निवडणुका लागण्याची शक्यता असून, पुढील निर्णयासाठी ग्रामस्थ आणि प्रशासन दोघेही प्रतीक्षेत आहेत.


एकूणच, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय म्हणजे शिरपूर तालुक्यातील ग्राम राजकारणाला चपराक देणारी घटना ठरली आहे. शिवाय  हा निर्णय बेजबाबदार लोकप्रतिनिधींसाठी मोठी चपरा ठरला असून तालुक्यात मोठा चर्चेच्या विषय झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने