शहरातून ट्रक च्या टायरची चोरी करणारे आरोपींना छत्रपती संभाजी नगर मधून शिरपूर शहर पोलिसांकडून अटक




शहरातून ट्रक च्या टायरची चोरी करणारे आरोपींना छत्रपती संभाजी नगर मधून शिरपूर शहर पोलिसांकडून अटक

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक 3 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत माल ट्रक वाहनाचे तीन टायर व टायर व्हील 60 हजार रुपये किमतीचे चोरीस गेल्याची तक्रार  धीरज कुमार पाटील राहणार घोडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम प्रेम कमल नगर मांडळ शिवार शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच ट्रक शेजारी असलेल्या जीन कुशल किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातले ड्रायव्हर मधून 10 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे आदेश शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिले होते. 

या गुन्ह्याच्या तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने त्यांच्या शोध सुरू होता. या दरम्यान पोलिसांना गोपनीय बातमी मिळाली की सदरचे चोरी करणारे इसम हे छत्रपती संभाजी नगर येथील राहणारे असून त्यांनी या गुन्ह्यात अशोक लेलँड कंपनीचे दोस्त वाहन क्रमांक एम एच 11 एक्स 75 03  या वाहनाच्या वापर केला आहे. 

त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले होते. 

या ठिकाणी संशयतांच्या शोध घेत असताना सदरचे वाहन मिळून आले, त्यावरील चालकाला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शाकीर रज्जाक शेख वय 35 राहणार पडेगाव मिटमिटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. सखोल चौकशी केली असता सदरच्या गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे त्याने कबूल केले. त्यांना देखील या आरोपीने फोन करून बोलावले असता पोलिसांनी त्यांना देखील अटक केली त्यांची नावे शोयब इशा खान वय 30 राहणार बाबरा नगर सूतगिरणी मैदान जवळ गारखेडा छत्रपती संभाजीनगर व अयाज आयुब शेख वय 32 राहणार शंभू नगर दर्गा चौक शुभम लॉज जवळ गारखेडा छत्रपती संभाजी नगर अशी त्यांची ओळख पटली. या सर्व आरोपींनी संगणमताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनाची पंचां समक्ष झडती घेतली असता चोरीस गेलेले तीन टायर आणि व्हील प्लेटसह मिळून आल्याने मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तसेच चोरीस गेलेले दहा हजार रुपये आरोपींनी खर्च केल्याची कबूल केले.

त्यामुळे या कारवाईत शहर पोलिसांनी 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे वाहन आणि 60 हजार रुपये किमतीची चोरीस गेलेले टायर आणि प्लेट यासह तीन आरोपींना सीताफिने ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 11 एप्रिल पर्यंत न्यायालय आणि पोलीस कस्टडी आणि रिमाइंड मंजूर केले असून गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करत आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ ,संदीप दरवडे, डी.बी.पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, रवींद्र राखडमल ,विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी ,सोमा ठाकरे, सचिन वाघ,  भटू साळुंखे ,प्रशांत पवार, आरिफ तडवी, मनोज महाजन, आणि मनोज दाभाडे इत्यादींच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने