गांजा सदृश्य मालाची तस्करी करणारे पाच आरोपींना शिरपूर शहर पोलिसांकडून अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातून एसटी बस मधून गांजा सदृश्यमालाची तस्करी करणारे पाच आरोपी यांच्यावर संशय आल्याने मोठ्या शिताफीने शहर पोलिसांनी त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 9 एप्रिल रोजी 11:15 वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गांगुर्डे हे धुळे येथे जात असताना शिरपूर बस स्टॅन्ड इथून चार इसम हे त्यांच्या पाठीवर बॅग असलेले व त्यांच्यासोबत एक महिला तिच्या देखील पाठीवर बॅग असलेले हे धुळ्याकडे जात असलेल्या एसटी बस मध्ये बसले होते. याच बस मध्ये असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना त्यांच्या बॅगेतून उग्र वास आल्याने त्यांच्या संशय बळावला त्यांनी तातडीने या बॅगांची तपासणी केली असता या बॅगांमध्ये गांजा सदृश्य अमली पदार्थ असल्याची त्यांची खात्री झाली. यानंतर सदरची माहिती पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना माहिती देऊन सदर बस पुन्हा स्थानकावर आणण्यात आली आणि पंचा समक्ष पंचनामा करून बॅग जप्त करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत 02 लाख 70 हजार 800 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा आंबट, उग्र वासाच्या ओल्या बिया पाला व काड्या मिश्रित गांजा नावाच्या अमली पदार्थ तसेच 30 हजार रुपये किमतीचे 03 मोबाईल असा एकूण 03लाख 8 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणात दिनेश इंद्रसिंह पावरा वय 24 ,शेखर जिऱ्या पावरा वय 19, तिन्ही राहणार चिलारी तालुका शिरपूर, एक विधी संघर्षग्रस्त बालक, गोविंद प्रधान पावरा वय 22 राहणार मोहिदा तालुका शिरपूर, कविता उर्फ नाणी जायमल आर्य वय 24 राहणार पेंढारण्या तालुका शेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, डी.बी. पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे ,रवींद्र आखडमल, अनिल सोनार ,पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार गांगुर्डे ,गोविंद कोळी ,विनोद आखडमल, योगेश दाभाडे, सोमा ठाकरे, सचिन वाघ, भटू साळुंखे ,प्रशांत पवार ,आरिफ तडवी, मनोज महाजन, मनोज दाभाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती गुजराती इत्यादींच्या पथकाने केली आहे.
.jpeg)