शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात भीषण आग – एका सामान्य कुटुंबाचा उध्वस्त संसार




 शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात भीषण आग – एका सामान्य कुटुंबाचा उध्वस्त संसार


शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात हृदयद्रावक घटना घडली असून, एका सामान्य कुटुंबाच्या घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी संघर्ष करणाऱ्या रवींद्र राजपूत यांच्या कुटुंबावर हे संकट आभाळा एवढं कोसळलं आहे.


रवींद्र राजपूत एका ऍग्रो एजन्सीवर काम करून आपला परिवार चालवत होते, तर त्यांची पत्नी बिडी कारखान्यात कष्ट करून संसाराला हातभार लावत होती. दोघे मिळून प्रामाणिकपणे आयुष्य जगत होते. पण नियतीने अशी करवट घेतली की, एका क्षणात सगळं संपलं. अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य आणि मुलांचे शैक्षणिक साहित्य – सर्वकाही जळून नष्ट झालं.


ही आग केवळ एका घरापुरती मर्यादित नव्हती, ती त्यांच्या स्वप्नांनाही भस्मसात करून गेली. जिथे कधी हसण्या-खिदळण्याचे आवाज असायचे, तिथे आता फक्त राख आणि हळहळ उरली आहे. गावकरी आणि शेजाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून, प्रत्येकजण या संकटाबद्दल दुःख व्यक्त करत आहे.


या सामान्य कुटुंबाच्या मदतीसाठी गावातून आणि समाजातून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्याकडून शक्य ती मदत केली गेली, तर त्यांना पुन्हा एकदा जीवनाला नवी सुरुवात करता येईल.


काल ही घटना घडल्यानंतर विविध स्तरावरून त्यांना मदतीचे हात पुढे आले आहेत. धोंड्याच्या येथील प्रसिद्ध उद्योगपती सरकार साहेबराव यांनी या कुटुंबाला 21 हजार रुपयांची मदत जाहीर केले असून लवकरच ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.


आपली छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यात नवा उजेड आणू शकते. चला, आपणही या दुःखद प्रसंगी एक हात पुढे करूया.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने