*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे यांना संशोधनासाठी अनुदान*




 *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे यांना संशोधनासाठी अनुदान*

         कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे यांना रु. 90,000/- अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचा उपयोग क्रीडा क्षेत्रातील संशोधनासाठी केला जाणार आहे.


डॉ. प्रताळे यांनी  *धुळे जिल्ह्याच्या विशेष संदर्भात व्यायाम सवयी, फिटनेस समस्या आणि वेगवेगळ्या वयोगटातील व्यावसायिकांच्या फिटनेस स्थितीचे विश्लेषण* संबंधित महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला होता, जो विद्यापीठ प्रशासनाकडून मान्य करण्यात आला. या प्रोत्साहन योजनेचा उद्देश विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधकांना नवनवीन संशोधनासाठी प्रेरित करणे हा आहे.

या अनुदानामुळे क्रीडा विज्ञान क्षेत्रात नव्या संशोधनास चालना मिळेल आणि समाजातील विविध घटकांचा व्यायाम आणि आरोग्य संदर्भात सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. सदर अनुदान प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रताळे यांचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.एस एस राजपूत, उपप्राचार्य डॉ. दिनेश भक्कड, डॉ. आबासाहेब देशमुख तसेच विद्यापीठ प्रशासन, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने