*सहकार भारती शिरपूरतर्फे* *महिला दिनानिमित्त गृह उद्योग कार्यशाळा*




 *सहकार भारती शिरपूरतर्फे* 

 *महिला दिनानिमित्त गृह उद्योग कार्यशाळा* 

सहकार भारती शाखा शिरपूर तर्फे महिला दिनानिमित्त कमी खर्चात, कमी मेहनतीत भरपूर फायदा देणारे आर्थिक स्वावलंबन देणारे लघु गृहउद्योगाची कार्यशाळेचे आयोजन श्री वैद्य मार्केट येथील सभागृहात करण्यात आले

कपडे व भांडी धुण्यासाठी लागणारे वाॅशींग पावडर, लिक्विड, फिनाईल, हॅडवाॅश, नीळ,फ्लॉवर क्लिनर रुम फ्लॅशनर शॅम्पु इतर रोज वापरतील घरगुती वस्तु कमी खर्चात व कमी वेळात तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या कार्यशाळेत विद्यार्थींनीना सहकार भारतीचे अखिल भारतीय कार्यालय प्रमुख व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ओडीशा येथील लक्ष्मणजी पात्रा यांनी  शिकवले विद्यार्थींनीनी यावेळी प्रत्यक्ष अनेक गृह उपयोगी साहित्य त्यांचा मदतीने तयार केले.

गाव पातळीवरील विद्यार्थींनी व महिला भगिनींना अशा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा माध्यमातून आर्थिक स्वावलंबन होण्याची प्रेरणा मिळेल असे मनोगत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप लोहार यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात नाशिक विभाग संघटन प्रमुख बंसीलाल अंदोरे, वि.का.सोसायटीचे महाराष्ट्र प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशसिंग सिसोदिया, धुळे ग्रामीण चे संघटन प्रमुख शशीकांत चौधरी, सह सचिव शांताराम सोनवणे, सुभाष राजपूत लौकी, पि.एच.देवरे, निता चौधरी, मनिषा महाजन उपस्थित होते या कार्यशाळेत सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने