धुळे -- महसूल सहाय्यक 13 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात
धुळे प्रतिनिधी - गौण खनिजाचे बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचेची केली मागणी पण भ्रष्टाचाराच्या हा डाव उलटा पडला तक्रारदार यांनीच लाख लूटपट प्रतिबंधक धुळे विभाग यांच्याकडे धाव घेतली आणि आणि दहा वाजता धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक यांना 13 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली होती.
या प्रकरणात आरोपी लोकसेवक-दिनेश सूर्यभान वाघ, वय 39 वर्षे,व्यवसाय - नोकरी,महसूल सहायक (गौण खनिज)उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे रा.धुळे जि.धुळे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने मौजे कोकले ता.साक्री शिवारात दि.5/03/2025 रोजी पकडून तहसील कार्यालय साक्री येथे जमा करण्यात आले होते.
सदर ट्रॅक्टर वर आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी धुळे यांचे कडून कमी करून देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या कडे 15,000/-रु लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.7/3/2025 रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.7/03/2025 व दि.10/03/2025 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती 13,000/-रु लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम धुळे उपविभागीय कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यानंतर आरोपीची अंगठी घेण्यात आली असून आरोपीच्या घराची देखील चौकशी केली जात आहे.
सदरची कारवाई .श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक यांच्या आदेशाने,पोलीस उपाधीक्षक धुळे श्री सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे.पो हवा/ राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर. इत्यादींच्या पथकाने केले आहे.
▶️ नागरिकांना आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे संपर्क करावा.* दुरध्वनी क्रमांक-
*टोल फ्री क्रमांक 1064 .*