बंजारा विद्यार्थ्यांना मुंबईतील* *कलाक्षेत्रात बक्षिसे*

 


*बंजारा विद्यार्थ्यांना मुंबईतील* *कलाक्षेत्रात बक्षिसे* 


शिरपूर - 

 बभळाज ता. शिरपूर येथील अनाथ असलेले व प्रतिकूल परिस्थितीतील बंधुद्वय विनोद व मनोज मोहन बंजारा आणि नातलग असलेला रोशन बंजारा हे तिघेही अनुक्रमे जगप्रसिद्ध सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट व सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई या कला महाविद्यालयात बी.एफ.ए.अप्लाईड/पेंटींग चे उच्च कलाशिक्षण घेत आहे. विनोद यांस वार्षिक कला प्रदर्शंनात डिनोव्हो कुलगुरू डॉ.रजनिश कामत यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनोज बंजारा यांस १०७वर्षे वय असलेल्या प्रख्यात आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई या संस्थेच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात विद्यार्थी गटात रिॲलिस्टिक लॅण्डस्केप व फिगरेटिव्ह पेंटिंग प्रकारात १)स्व.के.के.हेब्बर,२)स्व.रुस्तम दादाभाई सिओदिया,३)स्व.होमी एम.दल्लास,४)स्व.श्रीमती क्युमी एच.दल्लास अशी प्रतिष्ठेची चार पुरस्कार प्रसिद्ध कलावंत विद्याधर निमकर यांच्या शुभहस्ते व प्रख्यात चित्रकार डॉ.सुधीर पटवर्धन, प्रख्यात चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत, प्रख्यात अक्षरांकनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या उपस्थितीत तर सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट च्या वार्षिक कला प्रदर्शंनात "दिवाळीचे दु:ख"या चित्रास प्रसिद्ध चित्रकार,लेखक व समिक्षक डॉ . अविनाश कोल्हे यांच्या शुभहस्ते कॅमलीन अवाॅर्ड मिळाला आहे.



रोशन बंजारा यास "मानवीय वास्तुकला" या  रचनाचित्रास अधिष्ठाता डॉ शशिकांत गोरखे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान केला आहे.

तिघेही गुणवान विद्यार्थी बभळाज गांवाची शान आहे. विनोद यांस यापूर्वी देखील अनुक्रमे ६२ व ६३वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शंन पुणे, ठाणे येथे रोख बक्षिसे व दिल्ली येथील बिलियन हार्टस् बिटिंग फाऊंडेशन-२०२४ ही सन्मानाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे.मनोज यांस गेल्या वर्षी पण सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे बक्षिस मिळालेले आहे.

तिघेही ललित कला केंद्र चोपडा या शै.कला संस्थेचे माजी विद्यार्थी असून त्यांना से.नि.प्राचार्य राजेंद्र महाजन,कलाशिक्षक के.एल.पाटील व कलाशिक्षक भुषण मोरे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने