*जिल्हा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार राजकिरण राजपूत यांना जाहीर*
धुळे जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय यांचा संयुक्त विद्यमानाने ४६ सावे वार्षिक अधिवेशनाचे वाडी ता.शिंदखेडा येथे आयोजन करण्यात आले होते.कार्यकमाचे अध्यक्ष नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.दत्ता परदेशी होते.प्रमुख अतिथी क्रू.ऊ.बा.स.सभापती नारायण पाटील,जि.प.सदस्य पंकज कदम,साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल,जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील,जिल्हा ग्रंथालय निरीक्षक आत्माराम खंडिकर,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे,उपाध्यक्ष महेंद्र जाधव,नाशिक विभागीय संचालक डॉ.राहुल महिरे,प्रमुख कार्यवाह रोहिदास हाके,स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष सुवर्णसिंग गिरासे,आदी मान्यवरांचा उपस्थितीत पोलीस पाटील तथा लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजकिरण राजपूत यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप ट्राफी,सन्माणपत्र,शाल,श्रीफळ आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्हा व शिरपूर तालुका ग्रंथालय संघ,धुळे जिल्हा व शिरपूर तालुका पोलीस पाटील संघ,क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था-आढे,कुणबी पाटील बहुउद्देशिय संस्था-तऱ्हाडी,लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय आदींनी अभिनंदन केले आहे.