शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत वन पट्टे धारकांचे सक्षमीकरण ,शिरपूर तहसील कार्यालयाच्या उपक्रम
महादेव दोंदवडे तालुका शिरपूर येथील अतिदुर्गम भागात शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा या उपक्रमांतर्गत वनपट्टे धारक लाभार्थी यांचेसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सदर कॅम्पमध्ये उपस्थित लाभार्थी यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी करण्यात आली असून नागरिकांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. सदर उपस्थित नागरिक यांना शासनाच्या विविध कृषी विभाग,महसूल, वन तसेच आदिवासी विकास विभाग यांचे योजना बाबत मार्गदर्शन करन्यात आले तसेच उपस्थित नागरिक यांना शिधापत्रिका तसेच जात प्रमाणात यांचे वाटप करण्यात येऊन विविध लाभाच्या योजना बाबत फॉर्म भरून घेण्यात आले सदर कॅम्पमधे श्री शरद मंडलिक म उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर ,श्री महेंद्र माळी तहसिलदार शिरपूर,श्रीमती संगीताबाई किसन पावरा लोकनियुक्त सरपंच, श्री अधिकार पेंढारकर नायब तहसीलदार शिरपूर,श्री अनिल भामरे,मंडळ अधिकारी होळनाथे,श्री अनिल शिरसाठ ग्राम महसूल अधिकारी महादेव दोंडवडे व श्री दिनेश गुसिंगे ग्राम महसूल अधिकारी भाटपुरा व कृषी पर्यवेक्षक उपस्थीत होते.