शिरपूर महसूल प्रशासनाकडून अतिक्रमित शेत रस्ते मोकळे करण्याची मोहीम
शिरपूर - मा मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी अंतर्गत उपक्रमात शिरपूर तालुक्यातील अतिक्रमित रस्ता मोकळा करणे या मोहिमे अंतर्गत आज दिनांक २६.२.२५ रोजी मौजे चिलारे ते सुळे 3 कि मी शिव रस्ता अतिक्रमित होता सदर रस्ता आज मोकळा करण्यात आला.
सदर रस्ता मोकळा झाल्यामुळे साधारणता 35 शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल नेआन करण्यास लाभ होत आहे.
सदर शिव रस्ता मोकळा करण्याचे काम तहसीलदार महेंद्र माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्तितीत शितल गिरासे मंडळ अधिकारी दहिवद , देवेंद्र इशी तलाठी, तसेच गावाचे सरपंच अमोल रवींद्र पावरा, उपसरपंच राजधर पावरा., रवींद्र सजन पावरा ,रोहिदास भीमराव गिरे, रणजीत सतीलाल पावरा,तसेच
सायसिंग ढेमश्या पावरा, कोमल सिंग विठ्ठल पावरा ,रंजीत पावरा, गुलाब सिंग मानसिंग पावरा इतर गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.