*सावळदे येथे एकलव्य जयंती उत्साहात साजरी!*
शिरपुर (प्रतिनिधी) : सावळदे ता. शिरपुर येथे वीर एकलव्य जयंती निमित्ताने दि. २५ फ्रेबुवारी रोजी दुपारी विर एकलव्य प्रतिमा पूजन व भव्य मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी एकता परिषदेचे शिरपुर तालुका अध्यक्ष श्री. राजु सोनवणे तसेच सावळदे गावाचे उपसरपंच सचिन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कार्यक्रमासाठी थाळनेर चे माजी सरपंच तथा सनशाईन उद्योग समुहाचे संचालक श्री. प्रशांत पाटील, धुळे जिल्हा राजपूत समाज अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, उद्याेजक श्री. योगेश राजपूत, टेंबे वि.का.सेवा सो.अध्यक्ष भरत राजपूत, शिरपुर कृ.उ.बा.समिती संचालक विठोबा महाजन, सुरत गुजरात येथील रॉकी स्टार बँडचे संचालक श्री. पिंटुभाई,
करणी सेना प्रदेश अध्यक्ष श्री. विरपाल राजपूत, उद्योजक श्री. प्रदीप राजपूत, डाॅ. संदिप गिरासे, श्री. अमरदीप राजपूत, श्री रवींद्र तंवर, श्री. महेंद्र बाविस्कर, श्री. राकेश पाटील, पिंपरीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करण्यात आल्यावर सुरत (गुजरात) येथील राॅकी स्टार बँडच्या तालावर दुपारी १२ वाजता वीर एकलव्य चौक येथुन भव्य मिरवणूकीला सुरूवात झाली. बस स्थानक, मारुती मंदिर, जुने गावातून महादेव मंदिर पर्यंत मिरवणूक पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे थाळनेरचे माजी सरपंच श्री. प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,
एकलव्य, एक महापराक्रमी धनुर्धर, ज्यांनी गुरुनिष्ठेचे आणि चिकाटीचे अद्वितीय उदाहरण जगासमोर ठेवले, त्यांची जयंती दरवर्षी प्रेरणादायी ठरते. ते म्हणाले, "एकलव्य हे केवळ एक महान धनुर्धर नव्हते, तर ते निष्ठा, समर्पण आणि चिकाटीचे प्रतीक होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि ते साध्य करून दाखवले. आजच्या तरुणांनी एकलव्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे."एकंदरीत, एकलव्य जयंतीचा हा सोहळा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्याने तरुणांनी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि ते साध्य करण्याची प्रेरणा दिली असे मत त्यांनी यावेळी मांडले. पंचक्रोशीतील आदिवासी समाज बांधव महिला युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र भील, सचिन राजपूत, प्रकाश भोई, दगड़ू भील, रावसू भील, गोटू भील, शाहाना भील, देवा भील, देवीदास भील, रतिलाल भील,अशोक भील, निम्बा भील, धर्मा भील, गुलाब भील, चूडामन भील, संतोष जगदेव, प्रवीण जगदेव, धूडकू जगदेव, राजू शिरसाट, आनंदा इंदासे, अरुण रुक्मणि, चंद्रभान जगदेव, रणवीर राजपूत, प्रणव राजपूत, ऋषिकेश राजपूत, आशीष राजपूत, राज राजपूत, कृष्णा राजपूत, प्रथमेश राजपूत, प्रीतेश राजपूत यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार पिंपरीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले.