शिरपूर शिव महापुराण कथेच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या एकास ८ मोबाईलसह शिताफीने अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात शिवमहापुराण कथा महोत्सव सुरू आहे. दररोज लाखो वाईट या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी येत आहेत. या गर्दीच्या फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने काही चोरटे देखील येथे दाखल झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन ते मोबाईल किंवा सोन्याच्या वस्तूंवर हात मारत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रारी देखील दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने तपासणी करत असताना एका अट्टल मोबाईलच्या चोरट्याला तब्बल आठ मोबाईल सह पोलिसांनी अटक केली आहे.
शिरपूर शहर पो.स्टे.गुरनं. ६५१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे-क्रिष्णा सुनिल सुर्यवंशी वय १९ व्यवसाय-शिक्षण रा. पिंप्राड ता. शिंदखेडा जि.धुळे यांनी फिर्याद दिली की, दि.०४/१२/२०२४ रोजी १७.०० ते १७.४५ वाजेचे दरम्यान शिरपूर जि.धुळे शहरातील करवंद रोडवरील श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी ते कथा पाहण्यासाठी गेले असता त्यांचे खिशातील १५,०००/- रूपये किंमतीचा रियल मी-१० प्रो कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI क्र.८६१०२५०६११०३४१७ व ८६१०२५०६११०३४१२ असा असलेला तसेच साक्षीदार नामे-भरत बन्सीलाल पाटील रा. अकुलखेडा ता. चोपडा जि. जळगाव यांचा ८,०००/- रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा MORS मॉडेलचा मोबाईल त्याचा IMEI क्र. ३५०१३४२४२६२८७४४ व ३५०१३४२४२६२८७०१ असा असलेला कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने प्रभारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपासचक्रे फिरविली असता एक इसम श्री शिव महापुराण कथेच्या स्टेजच्या मागे मांडळ गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर पाठीवर सॅक (बॅग) लावुन व दोन्ही हातांमध्ये मोबाईल घेवुन संशयीतरित्या फिरतांना दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव-मोहम्मद अहमद बिलाल अहमद वय ३९ रा.घर नं. १७०, शब्बीर नगर मेन रोड मालेगाव जि. नाशिक असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे हातातील मोबाईलांबाबत विचारपूस करता तो काहीएक माहिती देत नसल्याने दोन पंचांसमक्ष त्याचे हातातील दोन्ही मोबाईलचे IMEI नंबरची खात्री करता सदरचे दोन्ही मोबाईल हे सदर गुन्ह्यातील चोरीस गेला माल असल्याची खात्री झाली. तसेच सदर इसमाचे पाठीवरील बॅगची पाहणी केली असता सदर बॅगमध्ये शिरपूर जि.धुळे शहरातुन व इतर ठिकाणांहुन चोरी केलेले विविध कंपनीचे ६ मोबाईल स्विच ऑफ असलेले मिळुन आले असुन त्याच्याकडून 78 हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे तसेच उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी शिरपूर तालुका पो.स्टे. चार्ज शिरपूर शहर पो.स्टे. तसेच सहा. पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, संदिप पाटील, पोउनि/संदिप दरवडे, हेमंत खैरनार, चांगदेव हंडाळ तसेच डी. बी. पथकाचे पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रशांत पवार, आरीफ तडवी, मनोज महाजन, मनोज दाभाडे, भटु साळुंके, सचिन वाघ तसेच होमगार्ड शरद पारधी, राम भिल, मिथुन पवार, सुनिल पावरा, हेमंत पाटील, तेजस अहिरराव, जगदिश निकुंभ व दिपक ठाकरे अशांनी मिळून केली आहे.
