विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत शिरपूरच्या अक्षय माळी ठरले सुवर्णपदक विजेते
शिरपूर -कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत, आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा साक्री येथे आज संपन्न झाल्या.सदर स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा पैलवान कु. अक्षय भटू माळी यांने आपल्या वजन गटातील प्रतिस्पर्ध्याला नमवित विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक प्राप्त केले. सदर कामगिरीच्या आधारे तो गणपत विद्यापीठ मेहसाणा गुजरात येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवेळ.अक्षयने मिळविलेल्या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे, सचिव श्री. निशांत रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, विश्वस्त आणि जनसेवक बाबासो.रोहित रंधे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस राजपूत, उपप्राचार्य डॉ.दिनेश भक्कड,डॉ आबासाहेब देशमुख, क्रीडा संचालक डॉ.एल.के प्रताळे,प्रा. राधेश्याम पाटील आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
